एक्स्प्लोर

Shivsena : अंधेरी पूर्व विधानसभेसाठी शिवसेनेचं ठरलं; ऋतुजा लटके देणार शिंदे- भाजपला लढत

Andheri East Bypoll Election: अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे मुरजी पटेल आणि शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांच्यात लढत होणार आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा ट्रेलर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसणार असून शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या आधीच मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे-भाजप गट पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. 

अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. शिवसेनेमधील ऐतिहासिक फुटीनंतर या ठिकाणच्या जागेवर सुरुवातीला शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता. पण या ठिकाणचे भाजपचे मुरजी पटेल यांनी या ठिकाणाहून आधीपासून तयारी सुरू केली होती. मुरजी पटेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने या ठिकाणी भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना अंधेरीमध्ये होणार आहे. 2019 मध्ये युतीमध्ये अंधेरीची जागा शिवसेनेने जिंकली होती. परंतु आता मुंबईत पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीच्या निमित्ताने रंगेल.

2019 मध्ये अंधेरीत काय समीकरण होतं?

  • 2019 विधानसभामध्ये भाजप आणि शिवसेनाची युती झाल्यामुळे शिवसेनाचे दिवंगत उमेदवार रमेश लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मधून तिकीट मिळालं. 
  • त्यामुळे नाराज मुरजी पटेल 2019 विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे होते.  
  • त्यावेळी मुरजी पटेल यांना 45808 मत मिळाली होती.  
  • तर शिवसेना आमदार रमेश लटके यांना 62,772 मते मिळाली होती.  
  • 2019 विधानसभा निवडणुकीत 16,964 मतांनी रमेश लटके विजयी झाले होते.  

विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या आधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध भाजप-शिंदे गट अशी होणार आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून  6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. शिवाय शिवसेनेचा निवडणूक चिन्ह कोणाला मिळतं याचीही उत्सुकता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?Walmik Karad Kej Hospital : खांद्यावर गमछा, कॅमेरासमोर जोडले हात; वाल्मिक कराड केज रुग्णालयातAshok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
Embed widget