एक्स्प्लोर

Mumbai: मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर, धुळीमुळे दृश्यमानता कमी

Dust storm in Mumbai : पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील  वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला.

Dust storm north Konkan area include Mumbai : सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली आहे. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात काल घट झाली असल्याचं पाहिलं मिळालं. रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 23.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे 6 आणि 7 अंशांची घट झाली होती. हे गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे. कुलाबा येथे 21.6 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 21 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. यासोबतच रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ 436 म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता. भांडुप येथे 336, माझगाव येथे 372, वरळी येथे 319, वांद्रे कुर्ला संकुल येथे 307, चेंबूर 347, अंधेरी 340 असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला.  

पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील  वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते. त्यामुळेच वातावरणात काल सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे. मात्र या धूळ युक्त हवेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असून सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Mumbai: मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर, धुळीमुळे दृश्यमानता कमी

मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवली

मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवल्याचं दिसून येत आहे. काल मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 वर होता. मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार झाला होता. दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत, मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावमध्ये 315 एक्यूआय होता.

थंडीचा जोर, तापमानात मोठी घट

राज्यातील अनेक भागातील तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. मुंबईतील कमाल तापमानात आज मोठी घट नोंदवली गेली आहे. रविवारी सांताक्रुज वेधशाळेत कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय तर कुलाब्यात कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस होतं. शनिवारी कमाल तापमान हे 29.7 अंश सेल्सिअस होतं. मुंबईत मागील 10 वर्षातील सर्वात कमी कमाल तापमान नोंदवलं गेलंय. आज सकाळपासूनच धुक्याचं चित्र मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बघायला मिळालं होतं. सोबतच दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं कमाल तापमानात घट झाली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget