एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईकरांचं पाणी महागलं, पाणीपट्टी दरात वाढ
पाणीपट्टी दरात मुंबई महापालिकेकडून 3.72 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईकरांचं पाणी महागलं आहे. पाणीपट्टी दरात मुंबई महापालिकेकडून 3.72 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या घरगुती वापराच्या पाण्यासाठी प्रतिहजार लिटर मागे 4.91 रुपये जलआकार आहे. तो वाढून 5.09 रुपयांवर जाणार आहे.
दरवर्षी जास्तीत जास्त 8 टक्क्यांपर्यंत जलआकार वाढवला जाऊ शकतो. यंदा 3.72 टक्क्यांनी पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ उद्या मध्यरात्री म्हणजे 16 जूनपासून लागू होईल.
पाणीपट्टीचे नवे दर (प्रतिहजार लिटरमागे)
बिगर व्यावसायिक संस्था-
सध्या - 19.67 रुपये
वाढीनंतर - 20.40 रुपये
व्यावसायिक संस्था-
सध्या - 36.88 रुपये
वाढीनंतर - 38.25 रुपये
उद्योग, कारखाने-
सध्या - 49.16 रुपये
वाढीनंतर - 50.99 रुपये
थ्री स्टारहून अधिक स्टार हॉटेल्स आणि रेसकोर्स-
सध्या - 73.75 रुपये
वाढीनंतर - 76.49 रुपये
शीतपेय, बाटलीबंद पाणी-
सध्या - 102.44 रुपये
वाढीनंतर -106.25 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement