एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी
सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत भाजपच्या जागृती पाटील या आघाडीवर आहेत.
मुंबई : मुंबईतील प्रभाग क्र. ११६मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.
काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. जागृती पाटील या प्रमिला पाटील यांच्या सून आहेत. मात्र, या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून लढता भाजपचा झेंडा हाती घेतला.
या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेनं बराच जोर लावला होता. पण अखेर भाजपनं मोठ्या मताधिक्यानं इथं बाजी मारली. पहिल्या फेरीपासूनच जागृती पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. हिच आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठ्या फरकानं विजय मिळवला.
या विजयामुळे मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणातही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LIVE UPDATE- भाजपच्या जागृती पाटील यांचा दणदणीत विजयी
LIVE UPDATE- पाचवी फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 9,971 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 5,229 मतं
LIVE UPDATE- चौथी फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 8234 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 3980 मतं
LIVE UPDATE- तिसरी फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 6333 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 3172मतं
LIVE UPDATE- दुसरी फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 2200 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 1087 मतं
LIVE UPDATE- पहिली फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 1887 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 952 मतं
संबंधित बातम्या :
मुंबई : वॉर्ड क्र. ११६मध्ये पोटनिवडणूक, सेना-भाजपत चुरशीची लढत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
Advertisement