Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, 13 जूनला पहिली गुणवत्ता यादी
Mumbai University : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पहिल्यांदाच बिगर स्वायत्त महाविद्यालयात 3 आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले असून 25 मे पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे.
![Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, 13 जूनला पहिली गुणवत्ता यादी Mumbai University pre admission online name registration process schedule announced first merit list on June 13 Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, 13 जूनला पहिली गुणवत्ता यादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/b4758b5b4c36f91796079561aad6967b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 25 मे पासून सुरू करण्यात येणार आहे.
नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी https://muadmissionug.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. हे संकेतस्थळ दिनांक 25 मे संध्याकाळी 5 नंतर उपलब्ध होणार आहे.
पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :
- अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) – 25 मे ते 10 जून (दुपारी 1.00 वाजेपर्यंत)
- प्रवेश ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 25 मे ते 10 जून, 2024
- ऑनलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – 25 मे ते 10 जून, (1.00 वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
- पहिली मेरीट लिस्ट – 13 जून, 2024 ( संध्याकाळी 5.00 वाजता)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 14 जून ते 20 जून, 2024 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत )
- द्वितीय मेरीट लिस्ट – 21 जून, 2024 (संध्याकाळी 5.00 वाजता)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – 22 जून ते 27 जून, 2024 ( दुपारी 3.00 वाजे पर्यंत)
- तृतीय मेरीट लिस्ट - 28 जून, 2024 ( संध्याकाळी 5.00 वाजता)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – 29 जून ते 03 जुलै , 2024 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत)
- कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन- 4 जुलै 2024
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)