एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश सुरू, 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी

Mumbai University : वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात येणार आहेत. 

मुंबई: मुंबई विद्यापीठातील (Mumbai University) सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडीओ लिंक देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेशअर्ज सादर करणे- 22 मे  ते 15 जून 2024

विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – 20 जून 2024 ( संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)

तात्पुरती गुणवत्ता यादी- 21 जून 2024 (संध्याकाळी 6 वाजता)

विद्यार्थी तक्रार – 25 जून 2024 (दुपारी 1 वाजेपर्यंत)

पहिली गुणवत्ता यादी – 26 जून 2024 (संध्याकाळी 6 वाजता)

ऑनलाईन शुल्क भरणे – 27 जून ते 01 जुलै 2024 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)

द्वितीय गुणवत्ता यादी- 02 जुलै 2024 (संध्याकाळी ६ वाजता)

ऑनलाईन शुल्क भरणे – 03 जुलै ते 5 जुलै 2024 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)

कमेंसमेंट ऑफ लेक्चर्स – 01 जुलै 2024

वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात येणार असून सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.

पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया 25 मे 2024 पासून

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 25 मे 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. 

या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ही बातमी वाचा: 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget