एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या एम ए परीक्षेचा निकाल जाहीर; विवेक पंडित आदेश बांदेकर प्रवीण शेट्टी मधुरा वेलणकर हे मान्यवर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

एमए प्रथम वर्षाचा निकाल 86.22   टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल  83.02 टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये अनेक मान्यवर बसले होते, ते या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई : जून 2021 मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर एमए भाग 1 व 2 या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यातील एमए प्रथम वर्षाचा निकाल 86.22   टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल  83.02 टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये अनेक मान्यवर बसले होते, ते या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

विद्यापीठाच्या एमए भाग 2 या परीक्षेत वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी वयाच्या 64 व्या वर्षी एमए राज्यशास्त्र या विषयात 94 % गुण प्राप्त केले आहेत. पत्रकार केतन वैद्य व  संगणकशास्त्र विभागाच्या डॉ.अंबुजा साळगावकर यांनी एमए इंग्रजी या विषयात प्रथम श्रेणी प्राप्त केली. या मान्यवरांबरोबर एमए भाग 2 मध्ये  2240 विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. तर 326 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून  328 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच एमए प्रथम वर्षाच्या परीक्षेत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, चित्रपट व टीव्ही कलाकार आदेश बांदेकर यांनी राज्यशास्त्र या विषयात 88.5 %, चित्रपट व टीव्ही कलाकार मधुरा वेलणकर यांनी मराठी विषयात 82 %, वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी राज्यशास्त्र या विषयात 76 % व कॅनडा येथील वैद्यकीय क्षेत्रातील एमडी असणाऱ्या डॉ.अलकनंदा धोत्रे यांनी इंग्रजी या  विषयात 70 % गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.

एमए भाग २ या परीक्षेत एकूण 2 हजार 894  विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 3 हजार 237 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत 3 हजार 231 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेला 6 विद्यार्थी अनुपस्थित होते. तर  या परीक्षेत 217   विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1: 00 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManisha Kayande : ठाकरे उठ सुट कोर्टात जातात, त्यांना दुसरं काम नाही - मनिषा कायंदेChitra Wagh BJP : कार्यकर्त्यांची पारख करणार पक्ष भाजप; त्याचीच पावती आम्हाला मिळालीBaba Siddique : बाबा सिद्दीकींवर गोळीबारानंतर आरोपींनी बॅग फेकून काढला होता पळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?
विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?
काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री कार्यालयातील 'त्या' हालचालींवरुन सूचक अर्थ काढला, 'एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय'
काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री कार्यालयातील 'त्या' हालचालींवरुन सूचक अर्थ काढला, 'एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय'
Ajit Pawar : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत अजितदादाचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत अजितदादाचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
Embed widget