![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai University Exam : राज्यात सरकारी सुट्टी, मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्यावतीने नवे वेळापत्रक (University Schedule) प्रसिद्ध करण्यात आले आहे.
![Mumbai University Exam : राज्यात सरकारी सुट्टी, मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या Mumbai University Exam Government holiday in the state Mumbai University 22 nd exams Postponed new date is 31January Mumbai University Exam : राज्यात सरकारी सुट्टी, मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/21/6fb12479343805d8a1a5b6dc0a983aca170580279557789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या (Ram Mandir Pran Pratishtha) पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) 14 परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 31 जानेवारीला या परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्यावतीने नवे वेळापत्रक (University Schedule) प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने 22 जानेवारी 2024 रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे
देशाचं लक्ष भव्य राम मंदिराच्या (Ram Temple) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागलं आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा पार पडणार आहे. राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी देण्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थी लांबून प्रवास करून येतात, या दिवशी त्यांची गैरसोय होऊ नये या सर्व गोष्टीचा विचार करून विद्यापीठाने 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातील प्रथम वर्ष बीए सत्र एक आणि प्रथम वर्ष बीकॉम - सत्र 1 या परीक्षा 22 जानेवारी ऐवजी 6 फेब्रुवारी आणि एमएमएस- सत्र 2 ची परीक्षा 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
22 जानेवारी पुढे ढकलण्यात आलेल्या विद्यापीठाच्या 14 परीक्षा खालीलप्रमाणे
सकाळ सत्र:
बी.कॉम. सत्र 5 , एमए पब्लिक पॉलिसी सत्र 3, एमए राज्यशास्त्र सत्र 1, एमएस्सी रिसर्च सत्र 1 या चार परीक्षा आहेत.
दुपार सत्र
बीएमएस - एमबीए ( पाच वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र 1, तृतीय वर्ष बीए सत्र 5, प्रथम वर्ष एलएलबी - जन. एलएलबी (तीन वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी - बीएलएस (पाच वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र 1, एलएलबी ( तीन वर्षीय अभ्यासक्रम, 75: 25) सत्र 1, बीए एलएलबी ( पाच वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम, 75:25 ) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी - जन. एलएलबी ( तीन वर्षीय अभ्यासक्रम, 60:40 ) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी - बीएलएस ( पाच वर्षीय अभ्यासक्रम, 60:40 ) सत्र 1, एमएसडब्ल्यू सत्र तीन, एमएस्सी रिसर्च सत्र तीन
या 10 परीक्षा आहेत. या 14 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांची सुधारित तारीख दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.
हे ही वाचा :
Ayodhya Ram Temple : 22 जानेवारीला महाराष्ट्रासह 'या' राज्यात शासकीय सुट्टी! काय सुरु, काय बंद? पाहा यादी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)