'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
हे सरकारसुद्धा मराठ्यांच्या ताकदीवर आल्याचं सांगत मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार असा इशारा नव्या सरकारला मनोज जरांगेंनी दिला..
Manoj Jarange On Maharashtra Assembly Result 2024: विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर किती असेल हा सगळ्यांच्याच कुतुहलाचा विषय झालेला असताना विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणणाऱ्यांना त्यांनी उत्तर देत आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणताय? असा सवाल करत नव्या सरकारचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. हे सरकारसुद्धा मराठ्यांच्या ताकदीवर आल्याचं सांगत मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार असा इशारा नव्या सरकारला मनोज जरांगेंनी दिला..
मराठा आरक्षण, लाडकी बहीण, नात्यागोत्यांच्या लढती,मनोज जरांगेंशी घेतलेल्या भेटीगाठी,कोट्यवधींची देवाणघेवाण, हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी आणि आश्वासनांची खैरात या मुद्द्यांवर गाजलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्याच्या ४६ जागांवर जरांगेंचा फॅक्टर किती चालला असा प्रश्न वारंवार विचारला जात असताना मनोज जरांगेंनी यावर उत्तर दिलंय.
जरांगे फॅक्टर फेल कसा झाला? मनोज जरांगेंचा सवाल
विधानसभेत मनोज जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणणाऱ्यांना मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. कोणत्या घटकानं श्रेय घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानातच नाही आणि तुम्ही म्हणता जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणता. आम्ही मैदानात नाही. कोण निवडणून आलं कोण पडलं याचं आम्हाला सोयरसुतक नाही. जेवढे निवडून आलेत ते सगळे मराठा फॅक्टरमुळंच आले असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. निवडून आलेल्या आमदाराला म्हणायला सांगा मराठ्यांच्या मतावर निवडून आलो नाही, हे सगळं कळायला तुमची हयात जाईल. तिथं बसून गप्पा ठोकू नका.
मराठ्यांशी बेईमानी कराल तर...
यांना दुसऱ्यांचे पाळणे लोटायची सवय आहे. मराठ्यांना कोणाचं सोयर सुतक नाही. मराठे उभे आहेत कुणीही आलं तरी..सरकारलाही सांगतो, निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला काही नाही. मराठ्यांशी बेईमानी कराल तर मराठ्यांना कोणाचंच सरकार रोखू शकत नाही. गावातल्या रडक्या पोरांसारखं झालंय हे. घरात नसलं की ते जसं रडतं तसं आम्ही मैदानातच नव्हतो. असं म्हणत जरांगेंनी नव्या सरकारला खडसावलं.
...मग दाखवलं असतं,सरकारला मनापासून शुभेच्छा
हे सुद्धा सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आले आहे.आम्ही मैदानात पाहिजे होतो मग दाखवले असते.मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हता.सरकारला मनापासून अभिनंदन शुभेच्छा. कोणी माजात मस्तीत यायचे नाही, तुम्ही सरकार आहेत.सत्तेत आलेत तर दादागिरी गुंडगिरी ची भाषा करायची नाही.मराठा मी बंधन मुक्त केला होता. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले मराठा समाज सोबत होता,मराठ्या शिवाय पान हालत नसते.कोणाचेही सरकार आले तर आम्हाला आंदोलन करावा लागणार आहे.