Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांचे शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती. त्यानंतर आता पाच महिन्यांनी शिवसेनेने पुनरागमन केले.
Eknath Shinde Shivsena : गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अनेक धक्के दिले. आता विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांचे शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती. त्यानंतर आता पाच महिन्यांनी शिवसेनेने पुनरागमन केले. कोपरी-पाचपाखरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे स्वतः मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. कोपरी-पाचपाखरी मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांच्याशी एकनाथ शिंदे यांची थेट लढत होती. एकनाथ शिंदे यांना 159060 मते मिळाली आणि त्यांनी केदार प्रकाश दिघे यांचा 120717 मतांनी पराभव केला. दिघे यांना केवळ 38343 मते मिळवता आली. कोपरी जागेवरील उर्वरित सात उमेदवारांना NOTA पेक्षा कमी मते मिळाली आणि त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली. येथे NOTA च्या बाजूने 2676 मते पडली.
गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांचा पराभव
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा झटका बसला आहे. शिंदे यांनी 2022 मध्ये गुवाहाटीला गेलेल्या सर्वांना निवडून आणले नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेऊ असे म्हटले होते. शिदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी झाली असली, तरी पाच आमदारांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर आणि ज्ञानराच चौगुले यांचा समावेश आहे. माहीममध्ये सदा सरवणकर यांचा तिरंगी लढतीत पराभव झाला. शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यात शेकापकडून पराभव स्वीकारावा लागला. भायखळ्यातून यामिनी जाधव पराभूत झाल्या. बुलढाण्यातून संजय रायमूलकर यांचा पराभव झाला. उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला.
महायुतीमधील विजयाची तीन कारणे
1. 'माझी लाडकी बहिण' योजनेमुळे महायुतीला महिलांची मते मिळाली
महायुतीच्या शिंदे सरकारने जून 2024 मध्ये 'माझी लाडकी बहिण' योजना सुरू केली. या योजनेंतर्गत वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत 2.34 कोटी महिलांना याचा लाभ मिळाला, जे राज्यातील एकूण महिला मतदारांपैकी जवळपास निम्मे आहे. निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'महायुतीची सत्ता आल्यास योजनेंतर्गत दरमहा 2100 रुपये दिले जातील', असे आश्वासन दिले होते. अनेकांनी त्याचे कौतुक केले.
2. संघ मैदानात उतरला, सभा घेतल्या आणि भाजपसाठी मते मागितली
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप आणि संघाचे संबंध बिघडत असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. निकालात भाजप 240 जागांवर घसरला. या निकालाचा संबंध आरएसएस आणि भाजपमधील बिघडत चाललेल्या संबंधांशी असल्याचे दिसून आले. यानंतर हरियाणाच्या निवडणुकीत संघाने मजल मारली आणि भाजपने 48 जागा जिंकून हॅटट्रिक केली. महाराष्ट्रातही भाजपची मते मागण्यासाठी संघ मैदानात उतरला.
लोकांना पटवून देण्यात महाविकास आघाडी मागे पडली
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान, अदानी आणि आरक्षण हे मुद्दे केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजप 240 पर्यंत घसरला आणि काँग्रेसने आघाडीसह 99 जागा जिंकल्या, परंतु महाराष्ट्रात हे मुद्दे फेल ठरले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या