मुंबई विद्यापीठातील आंदोलन भोवणार? युवा सेना आणि बुक्टोच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल
Mumbai University : कारवाईची नोटीस देऊन सुद्धा युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : विद्यापीठाच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुन्हा पार पाडावी आणि विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या (ठाकरे) 'युवा सेना' आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनच्या ('बुक्टु') अधिसभा सदस्य व कार्यकर्त्यांनी 15 एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाबाहेर आंदोलन केले होते.
मात्र जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारखे कृत्य केल्याप्रकरणी 'युवा सेना' आणि 'बुक्टु'च्या अधिसभा सदस्य, तसेच कार्यकर्ते अशा एकूण 23 जणांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही संघटनेस किंवा व्यक्तीस कोणत्याही स्वरुपाच्या सभा, आंदोलने, मोर्चा, उपोषण, निषेध मोर्चा, बैठका व तत्सम कोणत्याही कार्यक्रमाचे पूर्वपरवानगीशिवाय आयोजन करता येणार नाही, असा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सप्टेंबर 2024 च्या बैठकीत घेण्यात आला होता.
त्यानंतर याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषद बैठकीत मंजुरी मिळाली नसल्याचा दावा 'युवा सेना' आणि 'बुक्टु'च्या अधिसभा सदस्यांनी केला
15 एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाबाहेर मोठ आंदोलन केलं आणि त्या आंदोलन नंतर आता ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.
ही बाती वाचा :
























