एक्स्प्लोर

सावधान! मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरुन प्रवेशाचे आवाहन; तक्रार येताच सायबर विभागाचे आवाहन

सायबर क्राइम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंत, सायबर विभागानेही विद्यार्थ्यांना फसवणुकीपासून सावधान, अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई : राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी आणि मुंबईतील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं हक्काचं विद्यापीठ म्हणजे मुंबई विद्यापीठ (Mumbai university). सध्या नवीन शैक्षणिक वर्षांसाठी विद्यापीठात प्रवेश प्रकियेला सुरुवात झाली आहे. मात्र, याच कालावधीचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात सायबर क्राइम (Cyber crime) विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंत, सायबर विभागानेही विद्यार्थ्यांना फसवणुकीपासून सावधान, अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या नावाने सदर बनावट फेसबुक पेज https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले असून, त्यावर इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकण्यास सांगितले जाते. ही माहिती भरल्यानंतर वापरकर्त्याला https://www.markmonitor.com/online-com/ या संशयास्पद वेबसाईटवर वळवले जाते. या प्रकारातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि अधिकृत वेबसाईट व माध्यमांद्वारेच माहितीची खात्री करूनच पुढील पाऊल उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

मुंबई विद्यापीठ किंवा त्याच्या वतीने कुठल्याही अशा माध्यमातून प्रवेश प्रकिया राबवली जात नाही, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी अशा बनावट पेजपासून सावध राहावे आणि संशयास्पद माहिती त्वरित संबंधित यंत्रणांकडे कळविण्यात यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपली आर्थिक फसवणूक होऊ न देण्यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून सायबर विभागाकडून त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलची देखील माहिती खाली देण्यात आली आहे. 

मुंबई विद्यापीठाचे अधिकृत समाज माध्यम खाती खालील प्रमाणे:  

फेसबुक : //www.facebook.com/share/16NYoF47Qr/?mibextid=wwXIfr

इंस्टाग्राम : @uni_mumbai https://www.instagram.com/invites/contact/?igsh=1waqe9cui2ljn&utm_content=frrdwsd 

एक्स: https://x.com/uni_mumbai?s=21&t=4_dHhl9cp9NER8yj3DA9tQ 

यूट्यूब: https://youtube.com/@universityofmumbai_uom?si=Cn8v_VbmdtbuebSF 

व्हॉट्सअप चॅनेल: https://whatsapp.com/channel/0029Vb1yiOPK0IBi6rHdBw41

हेही वाचा

फाईली मंजूर होईनात, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार; पुण्यातील बैठकीत निशाण्यावर अजित दादा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
Maharashtra Live News Updates: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
KEM Hospital Dr. Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बरळली, आता डॉ.सेजल पवारचा लेखी माफीनामा, KEM रुग्णालय कारवाई करणार?
प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बरळली, आता डॉ.सेजल पवारचा लेखी माफीनामा, चौकशी समिती अहवाल देणार, KEM रुग्णालय कारवाई करणार?
Maharashtra Rain Updates: मान्सूनच्या वाटेत नवे संकट, कोकणात येऊन रखडला; पाऊस कधी कोसळणार? A टू Z अपडेट्स
मान्सूनच्या वाटेत नवे संकट, कोकणात येऊन रखडला; पाऊस कधी कोसळणार? A टू Z अपडेट्स
Three Language Formula Maharashtra: यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
Embed widget