मुंबईकरांना नववर्षाचं मोठं गिफ्ट, 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ; राज्य सरकारचा निर्णय
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून जवळपास 16 लाखांहून अधिक कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे. शिवसेना वचननामा देते, आणि ती पाळते असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबईकरांना 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं वचन 2017 साली दिलं होतं. ते आता शिवसेनेनं पाळलं."
नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबई करांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा निर्णय असल्याचं समजलं जातंय. मुंबई आणि शिवसेना हे नातं वेगळंच आहे. मुंबईकरांना शिवसेनेला भरभरुन दिलं आहे. मुंबईसाठी शिवसेनेने आपलं सर्वस्व दिलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळीही ते स्वत: मुंबईतील समस्येकडे जातीनं लक्ष देत होते. कोरोना काळातही मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं."
कोरोनाच्या काळात स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचा फायदा कोरोना काळातही लोकांना झाला, घरांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाला असल्याची माहिती नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- करुन दाखवलं! शिवसेना वचननामा देते आणि ते पाळते; मुंबईकरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
- समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
- राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झालं असतं पण...', शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा