Mumbai Traffic News : मुंबईत फॉर्म्युला 1 शो रन प्रोजेक्ट, वाहतूक व्यवस्थेत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
Mumbai Traffic News : मुंबई होणाऱ्या फॉर्म्युला 1 शो रन प्रोजेक्टमुळे रविवारी, 12 मार्च रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
Mumbai Traffic News : रविवारी, वांद्रे येथे होणाऱ्या फॉर्म्युला 1 शो रन प्रोजेक्ट कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 12 मार्च रोजी सकाळच्या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 11.30 वाजेपर्यंत बी.जे. मार्ग बँड स्टॅण्ड, वांद्रे वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात फॉर्म्युला 1 शो रन प्रोजेक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान बी.जे. मार्गा हा तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. 12 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.
#MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) March 11, 2023
On 12/03/2023, due to a Formula 1 Show Run Project organised on B.J Road, Bandstand, the road shall be temporarily closed to traffic from 9:30 am to 12:30 pm.
Alternative routes will be as under: pic.twitter.com/tMX3nElQM7
नो एंट्री/नो पार्किंग
- चिंबई नाका ते मन्नत हा बी.जे. रोड बँडस्टँड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याशिवाय, या कालावधीतही 'नो पार्किंग झोन' राहणार आहे.
पर्यायी मार्ग
- हिल रोडकडून बी.जे. रोडकडे जाणारी वाहतूक परेरा चौकीपासून डावीकडे वळण घेऊन माउंट मेरी रोडने पुढे जाईल आणि नंतर केन रोडने बी.जे.रोडकडे जाईल.
- बी.जे. रोड, बँडस्टँड येथून हिल रोडकडे जाणारी वाहतूक काणे रोडवरून उजवीकडे वळेल आणि माउंट मेरी रोडने हिल रोडकडे जाईल.
वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.