एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

मुंबई/सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला आहे. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील अनुचित घटना टळली. परंतु या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला विलंब झाला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव इथे जाणार होते. 10 वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचणार होते. परंतु दोन तासांनंतरही मुख्यमंत्री न आल्याने, याविषयी चौकशी केली असता, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दोन वर्षातील ही सहावी घटना आहे. लातूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं होतं. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात भरकटलं होतं. मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरचं विघ्न लातूर - 25 मे 2017 लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळलं अलिबाग - 7 जुलै 2017 हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला नाशिक - 9 डिसेंबर 2017 हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं भाईंदर - 11 जानेवारी 2018 हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने लँडिंग होणाऱ्या हेलिकॉप्टरने पुन्हा टेक ऑफ केलं सांगली - 24 ऑक्टोबर 2018 हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चकरा मारत होतं मुंबई - 3 जानेवारी 2019 उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं उघड. परिणामी त्यांच्या नियोजित सातारा दौऱ्याला विलंब झाला संबंधित बातम्या मुख्यमंत्र्यांच्या लातूर हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार : अहवाल सांगलीत मुख्यमंत्री फडणवीसांचं हेलिकॉप्टर भरकटलं 'विठ्ठलाच्या कृपेमुळे निलंग्यातील हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो' मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
आणखी वाचा























