एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परिचारकांना बडतर्फ करा, अन्यथा सभागृह चालूच देणार नाही : विरोधक
मुंबई : सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल आमदार प्रशांत परिचारकांची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द झाली नाही, तर सभागृह चालूच देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.
आज विधानपरिषदेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज ठप्प झालं आहे.
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधानपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदारांनी केली.
महिला आयोगासमोर बिनशर्त माफी
तर आमदार प्रशांत परिचारक यांनी वकिलाच्या माध्यमातून महिला आयोगासमोर बिनशर्त माफी मागितली आणि भविष्यात असं पुन्हा होणार नाही, असं आश्वासन दिलं.
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.
“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो.” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या :
परिचारकांचं निलंबन करा, विधानपरिषदेत सर्वपक्षीयांची मागणी सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली ‘ते’ वक्तव्य अनवधानानं निघालं’, परिचारकांचा माफीनामा आमदार प्रशांत परिचारकांना महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेशअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement