एक्स्प्लोर

Mumbai : मुंबईचा पाण्याचा प्रश्न मिटला; सातही धरण ओव्हर फ्लो; महापालिकेकडून धरणांची पाहणी

Mumbai Water Issue Solved : मुंबईचा पाण्याचा प्रश्न मिटला; सातही धरण ओव्हर फ्लो; महापालिकेकडून धरणांची पाहणी

Mumbai All Seven Water Supply Dams Oveflow : मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणामध्ये  पाणी साठ्यात लक्षणीय भर पडला असून ही सर्व धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभरा साठी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे . तर मुंबईची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पाण्याची मागणी देखील वाढत आहे त्यामुळे भविष्यात या सात धरणांमधून होणारे पाणीपुरवठा कमी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना केले जात आहे तर खारे पाण्याला गोड्या पाण्यात कसं बदलता येईल यासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले जेणेकरून मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल मुंबई पाणीपुरवठा विभागात जवळपास 11000 कर्मचारी काम करत करत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची निगा राखणे व मुंबईला पाणीपुरवठा करण्याची सर्व जबाबदारी पार पाडत असतात. या धरणांची मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. 

मुंबई शहराला  तानसा (455 द.ल.लि. प्रतिदिन), मोडक सागर (वैतरणा) (455 द.ल.लि. प्रतिदिन), मध्य वैतरणा (455 द.ल.लि. प्रतिदिन), उर्ध्व वैतरणा (640 द.ल.लि. प्रतिदिन) आणि भातसा (2020 द.ल.लि. प्रतिदिन) या जलस्रोतातुन पाणीपुरवठा करण्यात येतो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे 120 कि.मी. वा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ दोन लहान स्रोत विहार (90 द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (18 द.ल.लि. प्रतिदिन) आहेत. मुंबई शहराला या सर्व जलस्त्रोतातुन 3850 द.ल.लि. प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

पिसा तलाव येथे पाणी साठवून शुध्दीकरण करता पांजरापूर (1350 द.ल.लि. प्रतिदिन), भांडुप संकुल (2810 द.ल.लि. प्रतिदिन) आणि विहार (90 द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (18 द.ल.लि. प्रतिदिन) येथे आणले जाते. या अशुध्द पाणी वाहुन आणणाऱया जलवाहिन्यांना प्राथमिक स्तर व्यवस्था म्हणतात, जी सुमारे 400 कि.मी. एवढ्या लांबीची  आहे. प्राथमिक स्तर व्यवस्था मध्ये सुमारे 43 कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. जल शुध्दीकरण केंद्रामध्ये पाणी पोहचविल्यानंतर त्यामध्ये प्रथम (पीएसी) पॉली एल्युमिनियम क्लोराईड मिसळले जाते. हे पीएसी मिश्रीत पाणी मोठ-मोठ्या टाक्यांमधुन नेऊन त्यास संथ होण्यासाठी अवधी दिला जातो. यामुळे पीएसी ची प्रक्रिया पूर्ण होऊन जड झालेला गाळ / धुलीकण या मोठाल्या टाक्यांच्या तळाशी बसतात. हा गाळ सतत टाक्यांमधुन बाहेर काढला जात असतो. नंतर हे पाणी पूर्णतः गाळण्यासाठी रेतीचा / वाळूचा थर असलेल्या टाक्यांमधुन (रॅपिड सँड फिल्टर्स) मधून नेण्यात येते. पूर्णतः गाळलेले / शुध्द झालेले पाणी फिल्टर बेडच्या तळातून काढून घेवून निर्जंतुकीकरणासाठी पुढे नेण्यात येते. शुध्द पाणी बऱयाच लांबवर वाहून नेण्याचे असल्याने निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिक-ठिकाणी असलेल्या सेवा जलाशयापर्यंत पोहोचविले जाते.  योग्य शुध्दीकरण सुविधांमुळे WHO आणि IS - 10500 ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार जलशुद्धीकरण करणे साध्य झाले आहे. शुध्द पाण्याचा गढुळपणा पूर्ण वर्षभर 00.3 NTU वा त्यापेक्षा कमी असतो आणि रेसिड्युअल क्लोरीनचे ग्राहकाच्या ठिकाणचे प्रमाण 0.2 PPM एवढे असते.

पाणी जलशुध्दीकरण केंद्राजवळील महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिक-ठिकाणी असलेल्या 27 सेवा जलाशयापर्यंत पुढील वितरणासाठी विभागले जाते. यासाठी 1200 मि.मी. ते 2400 मि.मी. च्या पोलादी जलवाहिन्या आणि 2200 मि.मी. ते 3500 मि.मी. व्यासाच्या भूमीगत जलबोगद्यांचा वापर केला जातो. या जलवाहिन्यांची लांबी सुमारे 450 मि.मी. असून सुमारे 27 कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर वहन व्यवस्था म्हणतात. 

तलाव                       पाणीसाठा (दशलक्ष लीटर)            टक्केवारी
अप्पर वैतरणा                86,930                                    38.29                 
भातसा                      33,32526                                  46.47                 
मोडकसागर                1,13,181                                   87,79                  
मध्य वैतरणा                 91,457                                    47.26                
तानसा                        84,550                                     58.28                  
विहार                         13,951                                    50.37              
तुळशी                         5,691                                     70.73       

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
Embed widget