एक्स्प्लोर
रात्री 11.58 ला पहिली लोकल धावली
मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक हे दोन्ही महामार्ग खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या मुंबईत दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

मुंबई : लोकल आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झालेली नसली तरी, मुंबईकरांसाठी दिलाशाची बातमी आहे. पावसाचा जोर काहीसा थंडावला आहे, मात्र रस्त्यावरचं पाणी अजून पूर्णपणे कमी झालेलं नाही. दादर, परेल, लालबाग, हिंदमाता, वरळी भागातील पाणी हळूहळू कमी होऊ लागलं आहे. परंतु पाऊस कमी झाल्यानंतरही बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. रात्री 11.58 मिनिटांनी चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने पहिली लोकल धावली. दुसरीकडे (बुधवारी) पुन्हा मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्या पुन्हा आजसारखा पावसाचा जोर राहिल्यास मोठ्या खोळंब्याला तोंड द्यावं लागणार आहे. तुम्ही मुंबईबाहेर पडण्याचा बेत आखला असेल तर तोही तुम्हाला रद्द करावा लागणार आहे. कारण मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक हे दोन्ही महामार्ग खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या मुंबईत दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. 30 हजार कर्मचारी कार्यालयात अडकले मुसळधार पावसामुळे ऑफिसमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला आहे. जवळपास 30 हजार जण कार्यालयांतच अडकले आहेत. मुंबईत कुठे कुठे जेवण-खाण्याची आणि राहण्याची सोय दादर, प्रभादेवी : सिद्धीविनायक मंदिर अंधेरी : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्लेक्स मुलुंड : कालिदास नाट्यगृह सीएसएमटी : बाई काबीबाई शाळा ताडदेव : तुलसीवाडी गणेशोत्सव मंडळ मंडप दादर, माटुंगा, सायन, परेल : जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव, वडाळा. श्री हरजी बोजराज अँड सन्स. के व्ही ओ जैन छत्रालय श्रद्धानंद आश्रम रोड, माटुंगा सायन/दादर : शगुन हॉल, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा. दादर गुरुद्वारा, चित्रा सिनेमासमोर माटुंगा : एचएनआर टेक प्रायव्हेट लिमिटेड, पहिला मजला, भानुज्योती बिल्डिंग, एल एन रोड, माटुंगा मध्य रेल्वे स्टेशनसमोर घाटकोपर पूर्व : गणेश प्रिमियम टी पी एल, 103 नीलयोग स्क्वेअर, घाटकोपर रेल्वे स्टेशनसमोर वांद्रे, खार, सांताक्रूझ, माहिम सी लिकं : तिरुपती भवन, लिंकिंग रोड, अमरसन्सजवळ मस्जिद बंदर : महाजनवाडी चर्चगेट फोर्ट, सीएसटी : बालवीर सार्वजनिक गणेशोत्सव, डी एन रोड मालाड पश्चिम, अंधेरी पूर्, सांताक्रूझ पूर्व, मढ आयलंड : रक्षा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे : ए वन कॅटरर्स,रेल्वे हॉल, ठाणे स्टेशन जवळ मुंबईत येणारे महामार्ग रोखले
- मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कुसगाव, उर्से टोलनाक्याजवळ रोखली
- जुना हायवे NH 4 पण बंद
- नाशिककडून मुंबईला येणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ थांबवली
- अंधेरी – 270 मिमी/ 92 मिमी
- बीकेसी – 204 मिमी/ 54 मिमी
- वांद्रे पश्चिम – 247 मिमी/ 52 मिमी
- भांडुप – 251 मिमी/ 58 मिमी
- चेंबुर – 214 मिमी/ 62 मिमी
- कफ परेड – 123 मिमी/ 10 मिमी
- दहिसर – 190 मिमी/ 40 मिमी
- घाटकोपर पूर्व – 221 मिमी/ 61 मिमी
- गोरेगाव – 193 मिमी/ 65 मिमी
- परळ – 285 मिमी/ 40 मिमी
- कुर्ला – 300 मिमी/ 92 मिमी
मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली : महापौर
स्टेशनवर अडकला आहात? मुंबईतील या मार्गांवर बेस्टकडून अतिरिक्त बस
मुंबईत गेल्या एका तासात कुठे किती पाऊस? विभागनिहाय आकडेवारी
उभ्या पावसात पोलिसांचं काम पाहा, एक कडक सॅल्युट ठोकाल!मुंबईत 'पाऊस'फुल्ल, 'या' रस्त्यांवरुन जाणं टाळा
पाऊस अपडेट : राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी?
संबंधित फोटो फीचर
दादरच्या फूलमार्केटमध्ये पाणीच पाणी, गुडघाभर पाण्यात फुलं आणि हार
मुंबईत तुफान पाऊस, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी
आणखी वाचा























