एक्स्प्लोर

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी

Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळत आहे.

Mumbai Rain Updates: मुंबई : मुंबईसह (Mumbai Rain Updates) संपूर्ण महाराष्ट्रावर (Maharashtra Monsoon) वरुणराजानं कृपादृष्टी केल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, पुढचे तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पावसानं घातलेल्या धुमाकुळामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

लोकलवर कुठे काय परिणाम? 

  • मध्य रेल्वेवरील कर्जत-खोपोली, कसारा येथून सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंतच धावत असून ती पुढे रद्द करण्यात आली आहे.
  • भांडुप स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावर झाला आहे.
  • कुर्ला-मानखुर्द स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • वडाळ्यात पाणी साचल्यानं गोरेगाव-सीएसएमटी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा 

पुढील 3-4 तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील 24 तासांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 8 जुलै ते 10 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मुंबईमधे गेल्या सहा तासांत मुसळधार पावसाची नोंद 

रात्री 1 ते सकाळी सातपर्यंत अनेक ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद

  • दादर : 316 मिमी
  • पवई : 315 मिमी
  • डोंगरी : 292 मिमी
  • चकाला : 278 मिमी
  • आरे कॉलनी : 259 मिमी
  • जेव्हीपीडी : 255 मिमी
  • भायखळा : 241 मिमी
  • चेंबूर : 221 मिमी
  • सायन : 220 मिमी

मुंबई शहर आणि उपनगरांत मध्यरात्री 1 वाजेपासून सकाळी 7 वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणं आणि पावसाचे प्रमाण... 

  • वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (315.6 मिमी)
  • एमसीएमसीआर पवई (314.6 मिमी)
  • मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (292.2 मिमी)
  • चकाला महानगरपालिका शाळा (278.2 मिमी)
  • आरे वसाहत महानगरपालिका शाळा (259.0 मिमी)
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (255.0 मिमी)
  • नारीयलवाडी शाळा (241.0 मिमी)
  • जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (221.2 मिमी)
  • प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (220.2 मिमी)
  • नूतन विद्यामंदिर (190.6 मिमी)
  • लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (189.0 मिमी)
  • शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (185.8 मिमी)
  • रावळी कॅम्प (176.3 मिमी)
  • धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (165.8 मिमी)
  • बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (156.6 मिमी)

मुंबईत पावसाची कोसळधार 

मुंबई आणि उपनगरांत आज मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच, पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा ते टिटवाळा स्थानकांदरम्यान रुळांवर झाड पडल्यानं लोकल सेवा ठप्प आहे. कल्याण ते कसारा दरम्यान ट्रॅकवर डोंगराची माती पडून ओएचईला आधार देणारा खांब वाकल्याची घटना घडली. पनवेल-कळंबोली परिसरात ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane emotional PC : आज आहे, उद्या नसेन, पण नसलो तरी… पत्रकार परिषदेच्या शेवटी राणे इमोशनलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 22 March 2025Harshwardhan Sapkal PC | औरंगजेबाइतकेच इंग्रज क्रूर होते, त्यांची स्मारके काढणार का?Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
JAC meeting on Delimitation : अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
Embed widget