एक्स्प्लोर
वसईच्या मिठागरात चारशे कुटुंबं अडकली, आतापर्यंत शेकडो लोकांना सुखरुप बाहेर काढलं
वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साहाय्यानं येथील आतापर्यंत दोनशे जणांना रेस्क्यू ऑपरेशन करुन सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. परिसरातील घरांमध्ये कमरेइतकं पाणी भरलं आहे. आतापर्यंत परिसरात पाणी साचलं असलं तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
वसई : गेल्या दोन दिवसापासून सलग पावसाने वसई विरारला झोडपलं आहे. त्यामुळे वसई पूर्व मिठागर परिसराला पुरानं वेढलं आहे. मध्यभागी मिठागरची ही वस्ती असल्याने चारही बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. यामुळे नागरिकांच्या घरात देखील पाणी घुसलं असून मोठे नुकसान झाले आहे. परिसरात पाणी भरल्याने या परिसरात 400 कुटुंबं अडकली होती.
वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साहाय्यानं येथील आतापर्यंत दोनशे जणांना रेस्क्यू ऑपरेशन करुन सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. परिसरातील घरांमध्ये कमरेइतकं पाणी भरलं आहे. आतापर्यंत परिसरात पाणी साचलं असलं तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
यावेळी रेस्क्यू टीम उशीराने या ठिकाणी पोहोचल्याने नागरिकांनी रोषही व्यक्त केला. या परिसरात मागच्या जुलै महिन्यामध्येही रेस्क्यू करण्यात आलं होतं. काल रात्रीच्या सुमारास अर्नाळा गावात 80 ते 85 नागरिकांना रेस्क्यू करुन जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे.
आज वसईच्या राजीवली-वाघरालपाडा येथील 47 लोकांना रेस्क्यू करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तर वसईच्या कामण गावाजवळ साराजामोरी या गावात एनडीआरएफच्या टीमने 100 नागरिकांना रेस्क्यू करुन सुरक्षित ठिकाणी पोहोचविले आहे.
संबंधित बातम्या
LIVE RAIN UPDATE | पूर बघण्यासाठी गर्दी केल्यास गुन्हे दाखल होणार, नाशिकमध्ये पोलिसांचा मनाई आदेश
पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा, एक्सप्रेस अडकल्या, लोकलसेवाही ठप्प
Dam Overflow | पावसाच्या जोरदार हजेरीमुळे राज्यातील प्रमुख धरणं ओव्हरफ्लो | ABP Majha
सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार, मुंबईत अनेक सखल भागात पाणी, लोकलसेवेवर मोठा परिणाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement