एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत पुन्हा पाऊस सुरु, गरज असेल तरच बाहेर पडा!
यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने धुतल्यानंतर मुंबईकरांना रात्रीत थोडासा दिलासा मिळाला आहे.
मुंबई: यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने धुतल्यानंतर मुंबईकरांना रात्रीत थोडासा दिलासा मिळाला. रात्री पावसाने उसंत दिली, मात्र सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
ठप्प झालेल्या मध्य रेल्वेवरुन सकाळी 7.26 वा. पहिली लोकल कल्याणच्या दिशेने धावली. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु आहे.
हार्बर मार्गावरही सीएसटीवरुन पनवेलकडे लोकल रवाना झाली.
तर दादर, माटुंगा, सायन, हिंदमाता, परळ भागातअजूनही रस्त्यावर पाणी आहे. हे पाणी हळूहळू ओसरण्यास सुरु झालं आहे.
एबीपी माझा ट्रॅफिक अपडेट 8.15 AM
लोकल रेल्वेची सद्यस्थिती
- पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री 11. 58 मिनिटांनी चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने पहिली लोकल धावली.
- तर मध्य रेल्वे मार्गावर रात्री 12. 46 मिनिटांनी माटुंगा ते डोंबिवली दरम्यान पहिली लोकल धावली.
- ठप्प झालेल्या मध्य रेल्वेवरुन सकाळी 7.26 वा. पहिली लोकल कल्याणच्या दिशेने धावली.
- दुसरीकडे हार्बर रेल्वेबाबत अद्याप न बोललेलंच बरं, हार्बर रेल्वे अजूनही बंद
- ठाणे- वाशी ट्रान्स हार्बरची वाहतूक सुरु
- प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रात्री 12.40 पर्यंत सुरु होती, सकाळी ती नियमित सुरु झाली.
- www.abpmajha.in
- रात्रभर जॅम असलेले पूर्व आणि पश्चिम एक्स्प्रेस हायवे काहीसा मोकळा झाला आहे.
- इस्टर्न फ्री वेवरही सध्या ट्रॅफिक नाही
- जेव्हीएलआर मार्गावरील ट्रॅफिक रात्रीत रिकामं झालं आहे
- सायन-पनवेल महामार्गावरही ट्रॅफिक नाही
- नवी मुंबई - मुंबईच्या दिशेने येणारी पुणे आणि गोवा महामार्गाची वाहतूक रात्री १२ नंतर सुरू करण्यात आली आहे.
- मुंबईत विक्रमी पाऊस, वरळीत 303 मिमी पावसाची नोंद, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक ठप्प
- रस्त्यांवर गुडघाभर पाणी, रेल्वे ट्रॅकवरुन प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी
- मुंबईकडे येणारे महामार्ग रोखले, एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुलीही थांबवली
- मुंबईत दूध,भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
- अनेक कर्मचारी कार्यालयांत अडकले, बुधवारी शाळा, कार्यालयांना सुट्टी
- दादर, माहिम, परळ, लालबाग परिसरातील वीज गायब
- एसटी डेपोत प्रवाशांची गर्दी, एसटीकडून कसारा, नाशिक मार्गावर जादा बसेस
- बेस्टकडून मुंबईत जादा बसेसचा पुरवठा
- सिद्धीविनायक ट्रस्टकडून पावसात अडकलेल्यांची मंदिरात राहण्याची सोय
- लालबागचा राजा मंडळाकडून पावसात अडकलेल्यांची जेवण-खाण्याची सोय
- मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथकं मुंबईत
- मुंबईतील केईएम रुग्णालयात पाणी शिरलं
- रेल्वे बंद असल्याने कार्यालये दुपारी सोडूनही चाकरमानी स्टेशन्सवर अडकले
- महापालिकेची सर्व यंत्रणा रस्त्यावर, महापौरांचा दावा
- मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन नियंत्रण कक्षात धाव
- राष्ट्रपती,पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सर्वतोपरी मदतीची हमी
- ठाणे शहरातही वीजपुरवठा खंडीत
- मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द
- मुंबईत अनेक ठिकाणी रात्रभर फूडमॉल सुरु राहणार
- रस्त्यात कुठेही अडकल्यास हेल्पलाईन नंबर - 100 आणि 1916
मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली : महापौर
स्टेशनवर अडकला आहात? मुंबईतील या मार्गांवर बेस्टकडून अतिरिक्त बस
मुंबईत गेल्या एका तासात कुठे किती पाऊस? विभागनिहाय आकडेवारी
उभ्या पावसात पोलिसांचं काम पाहा, एक कडक सॅल्युट ठोकाल!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement