एक्स्प्लोर

Mumbai Rains Live Update : बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा महाराष्ट्रातही प्रभाव दिसणार; विदर्भात 12-13 जून रोजी पावसाचा अंदाज, मुंबईतही पाऊस वाढणार

Maharashtra Mumbai Rain live updates : हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. 

Key Events
Mumbai rain live updates Maharashtra weather forecast update in marathi 10 june 2021 heavy rain imd alert maharashtra mumbai monsoon updates Orange alert issued Mumbai Rains Live Update : बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा महाराष्ट्रातही प्रभाव दिसणार; विदर्भात 12-13 जून रोजी पावसाचा अंदाज, मुंबईतही पाऊस वाढणार
Rain_Update

Background

मुंबई : मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुबईला चांगलंच झोडपलं. मुंबईसह उपनगरांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पावसाच्या कोसळधारांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं, तसेच अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती. अशातच हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. 

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेनं केलेल्या ट्वीटनुसार, "भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. तसेच, पुढील चार दिवसांसाठी मुंबईत 'ऑरेंज अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया सतर्क राहावे व स्वतःची काळजी घ्यावी अशी विनंती"

मान्सूनच्या पहिल्याच सरींनी लोकल सेवा ठप्प

बुधवारी (9 जून) पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. साहजिकच याचा परिणाम हा सर्वप्रथम मुंबईच्या लाईफलाईनवर म्हणजेच मुंबई लोकलवर बघायला मिळाला. सतत पडलेल्या पावसामुळे ट्रॅकवरील पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर स्थगित ठेवण्यात आली होती. सोबत हार्बर मार्गावरील वाहतूक देखील स्थगित होती. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही पश्चिम रेल्वेवरील वाहतूक स्थगित झाली नाही. 

बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक 214.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात 190.78 मिमी आणि शहर भागात 137.82 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त 285.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटिंग, जनजीवन विस्कळीत

चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी - 248.52 मिमी, घाटकोपर - 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

14:32 PM (IST)  •  11 Jun 2021

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा महाराष्ट्रातही प्रभाव दिसणार; विदर्भात 12-13 जून रोजी पावसाचा अंदाज, मुंबईतही पाऊस वाढणार

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ओदिशा आणि आंध्रातील किनारपट्टी भागात येत्या 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातही याचा प्रभाव दिसणार असून 12 आणि 13 जून रोजी काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील संध्याकाळनंतर पाऊस वाढणार आहे. सध्या मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

10:03 AM (IST)  •  11 Jun 2021

मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची मुंबईत अखेर विश्रांती

मुंबईत मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं अखेर विश्रांती घेतली आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईसह लगतच्या काही उपनगरांतही पावसाच्या सरी कोसळत होत्या. मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यासही सुरुवात झाली होती. परंतु, पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे अखेर काही भागांत साचलेलं पाणी ओसरलं आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget