Sunday Street : मुंबईकरांसाठी पोलिसांकडून आजपासून 'संडेस्ट्रीट', तणावमुक्तीसाठी उपक्रम
आजपासून मुंबईकरांसाठी 'संडेस्ट्रीट' सुरू करण्यात आले आहे. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने मुंबईत सहा ठिकाणी हे संडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत.
Sunday Street : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या संकल्पनेतून आजपासून मुंबईकरांसाठी 'संडेस्ट्रीट' सुरू करण्यात आले आहे. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने मुंबईत सहा ठिकाणी हे सँडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत.
मुंबईकरांना रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी 'संडेस्ट्रीट' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आज संजय पांडे यांनी मरीन ड्राइव्ह या ठिकाणी या संडेस्ट्रीटमध्ये सहभाग घेतला आणि दौड केली.
मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणत मुंबईच्या विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. कोणी या मोकळ्या रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होते, कोणी सायकलींग करीत होते, तर कोणी स्केटिंग आणि योगा करीत होते. या संकल्पनेचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्याचबरोबर मुंबईच्या विविध भागात ही संडेस्ट्रीट तयार करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Thank you for participating in #SundayStreets initiative - Gr8 to see enthusiastic #Mumbaikars! https://t.co/K7sj856eWI
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 27, 2022
कुठे आहेत या संडेस्ट्रीट?
मरिन ड्राईव्ह- दोराभाई टाटा रोड, नरिमन पॉइंट – अक्षय भाटकर
वांद्रे- कार्टर रोड- ओटर्स क्लब ते सीसीडी
गोरेगाव- माइंड स्पेस मागील रस्ता,
दा. नौ नगर- लोखंडवाला मार्ग- समर्थनगर म्हाडा टॉवर्स ते जॉगर्स पार्क
मुलुंड- तानसा पाईप लाईन–मुलुंड गोरेगाव लिंक रोड
विक्रोळी- इस्टर्न एक्सप्रेस हायवे,विक्रोळी ब्रीज
महत्वाच्या बातम्या