आमदारांच्या घरांच्या मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी काँग्रेस आमदाराला सुनावलं! म्हणाले, तुमच्याकडे मुंबईत कोट्यवधीची 10 घरं
MLA Houses : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत घरं मोफत देणार नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ट्विटला आव्हाडांनी उत्तर दिलं आहे.
MLA Houses In Mumbai : मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात (Maharashtra budget session)केली. यानंतर या निर्णयावरुन अनेक मतमतांतर येत आहेत. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही आमदारांनी मात्र आपण ही घरं घेणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत घरं मोफत देणार नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्वीट करत मला महाराष्ट्र सरकारकडून घराची गरज नाही, असं म्हणत आमदारांना घरे देण्याऐवजी लोकांसाठी घरे बांधण्यासाठी हा पैसा खर्च करा, असं म्हटलं होतं.
ही सुविधा कोणासाठी उपलब्ध आहे हे सोडा. ती कोणत्याही आमदारांसाठी उपलब्ध नसावी. लोकांसाठी बरेच काही करणे आवश्यक आहे आणि ते आमचे पहिले ध्येय असले पाहिजे, असं सिद्दीकी यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I don’t need a house from the Maharashtra government when thousands of ppl in my Vandre east assembly aren’t getting houses & are living in dilapidated conditions.Request @CMOMaharashtra & @Awhadspeaks ji to spend this money to build their houses instead of giving houses to MLA’s
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) March 26, 2022
तुमच्याकडे मुंबईत कोट्यवधीची 10 घरं
यावरुन मंत्री जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ट्वीटला रिट्वीट करत उत्तर दिलं आहे. तुमच्याकडे करोडोची 10 घरे आहेत. ही योजना फक्त महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आमदारांसाठी आहे, मुंबईतील आमदारांसाठी नाही. मला वाटले तुम्हाला चांगली समज आहे. कोणालाही फुकटात घर मिळत नाही. आशा आहे की तुम्हाला ते आता समजले असेल, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
You have 10 houses worth crores and this scheme is meant only for #MLA of rural #Maharashtra and not for Mumbaiand I thought u have good understanding nobody is getting a house free of cost ..Hope u have understood it now @zeeshan_iyc https://t.co/AVYt9mfGxa
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2022
घरं मोफत नाहीत- आव्हाड
याआधीही आव्हाडांनी घरं फुकट देणार नसल्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
MLA Houses In Mumbai : व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला?
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला