एक्स्प्लोर

पाच वर्षात जलवाहतूक वाढवणार, बीकेसीत पॉड टॅक्सी सुरू होणार, बाईक टॅक्सीला मंजुरी; मुंबई वाहतूक कोंडींवर पर्याय 

Mumbai Transport Service News : लंडनच्या हिथरो एअरपोर्ट पॉड टॅक्सीच्या धर्तीवर बीकेसीमध्ये चालकविरहित पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Mumbai Transport Service News : मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईत पुढच्या पाच वर्षात जलवाहतूक वाढवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत जलवाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रोप्रमाणेच जलवाहतुकीसाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाईल. पुढच्या दोन वर्षात मुंबईकरांना वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार आहे. मुंबईच्या बीकेसीत 2028 पर्यंत पॉड टॅक्सीची सेवा सुरु होईल. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी रोप वेची सुविधा विकसित करण्याच्या विचारात परिवहन विभाग आहे.

मुंबईतील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी जलवाहतुकीचा पर्याय समोर आहे. बेस्ट, मेट्रो याप्रमाणे मुंबईत वॉटर मेट्रो किंवा वॉटर टॅक्सी याकरता स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाणार आहे. पुढील तीन महिन्यांत वॉटर ट्रान्सपोर्टचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुंबई महानगर क्षेत्रात खाडी आणि समुद्र मार्गाने शक्य तितक्या जास्त प्रमाणात वॉटर टॅक्सी सुविधा तयार करुन या सुविधेला शासन नियंत्रणाखाली आणले जाणार आहे. वॉटर मेट्रो किंवा वॉटर टॅक्सी हे प्रकल्प पीपीपी तत्वावर चालवले जातील. त्यामुळे शासनाचा यात फार खर्च होणार नाही. सरकार केवळ जेट्टी बांधून देणार आहे. 

मुंबईकरांना वाहतुकीचा नवा पर्याय

मुंबईकरांची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी 2028 पर्यंत बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सी बीकेसीत येणार आहेत. ही पॉड टॅक्सी चालकविरहित असणार असून वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.  

एका पॉड टॅक्सीतून एका वेळी 6 जणांना प्रवास करता येणार आहे. पुढच्या दोन वर्षात पॉड टॅक्सीचा प्रकल्प मार्गी लागेल. पॉड टॅक्सीकरता बांद्रा ते कुर्ला दरम्यानच्या मार्गीका निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी आता सर्वेक्षण सुरु आहे.

लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या धर्तीवरच पॉड टॅक्सी मुंबईच्या बीकेसीतही चालवल्या जातील. खाजगी कंपन्यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाईल. येत्या ऑक्टोबरमध्ये पॉड टॅक्सी सर्वेक्षणाचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर निर्मितीसाठी दोन वर्षांचा अवधी लागणार आणि त्यानंतर पॉड टॅक्सी सेना कार्यान्वित होणार आहे. 

गर्दीच्या ठिकाणी रोप वे सुविधा

मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, एक्सप्रेस हायवे, गर्दीची समुद्र किनाऱ्याची ठिकाणं , खाडी याठिकाणी रोप वे सुरू करण्यात येणार आहे. रोप वे सुविधेसाठी योग्य मार्ग शोधण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आदेश दिले आहेत. 

बाईक टॅक्सीची सेवा सुरू होणार

मुंबईत बाईक टॅक्सी बाबत परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत पुढच्या दोन महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्विस मुंबईत सुरु होणार आहेत. बाईक टॅक्सी सुरु करताना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणे बंधनकारक असेल . 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणीABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special ReportTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget