Mumbai Bike Taxis : मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार, परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी, महिला सुरक्षेचीही विशेष काळजी
Mumbai Bike Taxis : काही महत्त्वाच्या उपाययोजना करून मुंबईत आता बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक जलद होण्याची शक्यता आहे.
मुंबई : बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ओला, उबेरप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असून पुढच्या दोन महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरु होणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये तासंतास अडकून पडण्यावर आता पर्याय निर्माण होणार असून मुंबईकरांचा प्रवासही अधिक जलद आणि स्वस्तात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बाईक टॅक्सी सुरु करताना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच बाईक चालकाला मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणे बंधनकारक असेल.
मुंबई शहरात रॅपिडो सारख्या कंपन्यांनी या आधी टॅक्सी बाईक सुरू केल्या होत्या. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला होता. पण स्थानिक स्तरावर त्याला रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याचा अनुभव आला. तसेच त्याबाबत सरकारचे धोरणही स्पष्ट नव्हतं. त्यामुळे या कंपन्यांनी त्यांच्या सेवा बंद केल्या.
मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार
बाईक टॅक्सीमुळे मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर दिसणाऱ्या ट्रॅफिकमुळे पीक पीरियडमध्ये कामावर किंवा घरी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यांच्यासाठी आता बाईक टॅक्सीचा पर्याय असेल. त्यामुळे ट्रफिकच्या समस्येमधून सुटका होण्याची शक्यता आहे.
सेच बाईक टॅक्सीमुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक स्वस्त होणार आहे. कारण बाईक टॅक्सीमध्ये प्रती किमी 3 रुपये इतके भाडे आकारले जाते.
बाईक टॅक्सीसंबंधी धोरण आखताना महिला सुरक्षेला महत्व दिल्याचं दिसून येतंय. बाईक ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यामध्ये एक पार्टिशन असावे असा नियम करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:
- Kala Ghoda Arts Festival : काळा घोडा महोत्सव, पर्यटकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बचत गटांच्या उत्पादनांची भुरळ