एक्स्प्लोर
मुंबईत दीड वर्षांचा चिमुकला नाल्यात वाहून गेला!
गोरेगाव पूर्वेच्या आंबेडकर चौक इथल्या चाळींमध्ये दिव्यांशचे कुटुंब राहते. काल रात्री पावणे दहाच्या सुमारास दिव्यांश घरातून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या नाल्यात पडला आणि वाहून गेला.
मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले भरुन वाहत आहे. अशाच एका नाल्यात दीड वर्षांचा चिमुकला वाहून गेला. मुंबई उपनगरातील गोरेगावमध्ये काल (10 जुलै) रात्री ही दुर्दैवी घटना घडली. दिव्यांश सिंह असं या दीड वर्षांच्या मुलाचं नवा आहे.
गोरेगाव पूर्वेच्या आंबेडकर चौक इथल्या चाळींमध्ये दिव्यांशचे कुटुंब राहते. काल रात्री पावणे दहाच्या सुमारास दिव्यांश घरातून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या नाल्यात पडला आणि वाहून गेला. त्या आधी मुसळधार पाऊस पडून गेला होता त्यामुळे नाल्यात पाण्याचा प्रवाह जोरात होता. दिव्यांशला शोधत आलेल्या त्याच्या आईला तो कुठे दिसला नाही म्हणून शोध घेतला असता, सीसीटीव्ही मधून तो नाल्यात पडल्याचे समोर आले.
दिव्यांशला शोधण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक रात्रभर शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र तो सापडला नाही. अग्निशमन दलाकडून त्याची शोधमोहीम सुरु आहे. एक क्षण नजर चुकवून घराबाहेर आलेला दिव्यांशवर ही वेळ ओढवेल असे कुणाला वाटले नव्हते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement