दुबई ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सोन्याची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक, साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त
सलीम सगीर इनामदार (43 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा रायगड जिल्ह्यातील असून तो सिंडिकेटचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे.
![दुबई ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सोन्याची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक, साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त Mumbai News Accused smuggling gold from Dubai to Mumbai International Airport arrested gold worth Rs 4.5 crore seized दुबई ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सोन्याची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक, साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/14/04569fb1580f845ad9483a7173ef8d33169466734748989_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दुबई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सोन्याची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून जवळपास साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने कारवाई केली आहे. सलीम सगीर इनामदार (43 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा रायगड जिल्ह्यातील असून तो सिंडिकेटचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे.
सलीम हा त्याचा मोठा भाऊ साजिदसोबत दुबईतून सोन्याच्या तस्करीचे रॅकेट चालवत होता. डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले की सलीम पॅसेंजर, एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचारी व सोने वितळणारे यांच्यात अरेंजमेंट व कॉर्डिनेशन करत होता.काही दिवसापूर्वी डीआरआयने एका एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक करून आंतरराष्ट्रीय सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केले होते. डीआरआय अधिकाऱ्यांनी आरोपींकडून सुमारे 7.4 किलोग्राम सोने जप्त केले असून त्याची किंमत 4.51 कोटी रुपये आहे.
सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश
दुबई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सोन्याची तस्करी करणारे सिंडिकेट हे कार्यरत होते. विमानात प्रवास करून मुंबईला पोहोचण्याची जबाबदारी एका प्रवाशाची असते. नंतर तो प्रवाशी आपल्या सीटवर ते सोने ठेवायचा आणि निघून जायचा. एका एअरलाईन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुंबई विमानतळाबाहेर त्याची तस्करी होत होती. डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले की त्यांनी विमानतळाबाहेर डिलिव्हरी घेणाऱ्या व्यक्तीलाही अटक केली आहे. नंतर सोने वितळण्यासाठी एका सोनाराकडे नेण्यात येत होते. तर पुढे तारवाई करत एका पिता पुत्र सोनारालाही डीआरआयने अटक केली आहे.या सर्व प्रकरणात इतर आरोपींचा शोध आता डी आर आय कडून केला जात आहे.
सिंडिकेट दर महिन्याला 200 किलोचा पुरवठा करत असल्याचा संशय
दररोज 4 ते 5 प्रवासी सुमारे 4 किलो सोने मुंबईत कोट्यावधी रुपयांची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. सिंडिकेट दर महिन्याला 200 किलोचा पुरवठा करत असल्याचा संशय आहे. डीआरआय अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करायचा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी कोठून आणि कोठून होत होती, याचा शोध डीआरआय घेत आहे.
हे ही वाचा :
पोलिसांना टीप मिळाली... 80 बॉक्स भरून रेल्वेतून येतंय कोट्यवधी रुपयांचं सोनं; तपासानंतर प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)