एक्स्प्लोर

मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोनासोबतच स्वाईन फ्ल्यूदेखील फोफावतोय, आतापर्यंत 11 रुग्णांची नोंद

Mumbai News : मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरात चार रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांच्या मते, शहरात संसर्ग वाढत आहे.

Mumbai News : पावसाळा सुरु झाला की, अनेक आजार आपलं डोकं वर काढतात. मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसामुळं आणि बदलणाऱ्या वातावरणामुळं अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सर्दी, ताप, मलेरिया यांसारख्या आजारांसह स्वाईन फ्ल्यूचा (Swine Flu) प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, इन्फ्लूएन्झा H1N1 (Influenza H1N1) ची लागण झालेले किमान चार रुग्ण शहरात व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात पुन्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ज्या लोकांची कोविड -19 चाचणी निगेटिव्ह येत आहे, त्यांनी एच1एन1 चाचणी करावी, असं आवाहन नागरिकांना डॉक्टरांकडून वारंवार केलं जात आहे. 

जुलैमध्ये इन्फ्लूएंझा H1N1 च्या 11 रुग्णांची नोंद 

जुलैमध्ये इन्फ्लूएंझा H1N1 च्या 11 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर जूनमध्ये दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच, ओपीडीमध्ये दररोज स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या किमान दोन ते तीन रुग्णांची नोंद केली जात असल्याची माहिती डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आली आहे. कोरोनाप्रमाणेच H1N1 हादेखील श्वसनासंबंधातील आजार आहे. स्वाईन फ्ल्यूचाही कोरोनाप्रमाणेच 2019मध्ये जागतिक महामारी म्हणून प्रादुर्भाव दिसून आला होता. पण कालांतरानं त्याचा प्रादुर्भाव कमी झाला. 

गेल्या आठवड्यात राज्यातील H1N1चा पहिला मृत्यू 

गेल्या आठवड्यात राज्यात H1N1 मुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 10 जुलै रोजी पालघरच्या तलासरी येथील 9 वर्षीय मुलीचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे झाला होता. शहरात, गेल्या तीन वर्षांत H1N1 च्या एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. तर यापूर्वी 2020 मध्ये 44 आणि 2021 मध्ये 64 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

कसा ओळखणार आजार? स्वाइन फ्ल्यू की, कोविड-19?

कोविड 19 आणि स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणं सारखीच आहेत. ही लक्षणे ओव्हरलॅप होतयेत, त्यामुळे स्वाईन फ्ल्यू आणि कोविड 19 आजार ओळखणं हे थोडं अवघड आहे. स्वाईन फ्ल्यूमध्ये नाकातून पाणी गळणं, सर्दी होणं, अशी लक्षणं आढळतात. तर कोविड 19 मध्ये ताप येणं, चव जाणं, वास न येणं, अशी लक्षणं आढळतात. उपचार पद्धती दोन्ही आजारांची वेगळी असल्यानं आजार नेमका कोणता आहे हे ओळखणं सुरुवातीला गरजेचं असल्याचं मत ग्लोबल रुग्णालयाचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. हरीश चाफले यांनी मांडलम. शिवाय त्यांनी या दोन्ही आजारांबाबत समोर येत असलेल्या प्रश्नांची उत्तरं एबीपी माझाशी बोलताना दिली होती. 

दोन्ही आजारासाठी टेस्ट करणे गरजेचे आहे. दोन्हीसाठी नेजल swab टेस्ट केली जाते. ज्यामधून आपल्याला हे स्पष्ट होईल की नेमका आजार कोणता आहे.

मुंबईकरांनो काळजी घ्या 

दोन्ही आजार होऊ नये यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. शिवाय स्वाईन फ्ल्यूसाठी हात स्वच्छ ठेवणे, सॅनिटायजर वापर करणे महत्वाचे आहे. ज्या प्रकारची खबरदारी आपण कोविड 19 साठी सुद्धा घेत आहोत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget