नालासोपारा हादरलं! 17 वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन जण अटकेत
Mumbai Crime : फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
नालासोपारा : महाराष्ट्र राज्य ही संतांची, महापुरुषांची भूमी आहे, ज्या राज्यात महिलांना आईचा बहिणींचा मान मिळतो, त्याच महाराष्ट्रात मुली व महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत होत आहे. बदलापुरची घटना ताजी असतानाच नालासोपार्यात 17 वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी 17 वर्षीय पिडीत मुलीची एक मैत्रीण नालासोपार्यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्याला यायची. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्या तरुणाची तिची मागच्या आठवड्यात ओळख झाली होती. गुरुवारी 25 वर्षीय सोनू नामक तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडीत मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला.
दोन्ही आरोपींना अटक
मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित मुलीची केवळ 4-5 दिवसांची ओळख होती. तिला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.
10 वर्षीय मुलीवर अत्याचार
बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय.. अकोला शहरातल्या अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील हिंगणा तामसवाडी येथे ही घटना घडलीये. तेल्हारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आलं होतंय.. त्यानंतर मुलीला मुलीला नातेवाईकांकड ठेवून बाहेर गेलेय.. याच संधीचा फायदा घेत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केलाय. दरम्यान, घडलेला सर्व प्रकार 10 वर्षीय चिमुकलीने आई-वडिलांना सांगितला.. त्यांनी लागलीच अकोटफैल पोलीस स्टेशन गाठलं.. या प्रकरणात पोलिसांनी रात्री (376 जुना कायदा) अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा :