Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा? नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर माहिती
मुंबई मंडळासाठी म्हाडाच्या घरांची लॉटरी आली आहे. या लॉटरीत एकूण 2030 घरे वितरित केली जातील. त्यासाठीच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मुंबईत स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाने मुंबई मंडळासाठी एकूण 2030 लॉटरी आणली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करायचा असल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र तसेच अन्य कागदपत्रांची गरज आहे. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अर्जात चूक झाल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अर्ज दाखल कसा करायचा? त्यासाठी अटी काय आहेत? हे समजून घेऊ या..
अर्ज भरण्याची कार्यपद्धती
सर्वप्रथम म्हाडाच्या housing.mhada.gov.in किंवा mhada.gov.in या संकेतस्थळावर जावे येथे अथवा Mobile App - Mhada Housing Lottery System वर जावे. संकेतस्थळावर जाऊ अर्जदाराने सर्वप्रथम स्वतःची नाव नोंदणी करावी व सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. नाव नोंदणीसाठी अर्जदाराने, आवश्यक ती सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच बंधनकारक असलेली माहिती भरणे बंधनकारक आहे.
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी, म्हणजे अर्ज भरताना अडचण येणार नाही.
1. अर्जदार स्वतःचे व विवाहित असल्यास पती/पत्नी या दोघांचे आधारकार्ड,
2. अर्जदार स्वतःचे पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती/पत्नी दोघांचे पॅन कार्ड.
3. अर्जदार सध्या वास्तव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिन कोड क्रमांक नोंदणी करुन त्याची खात्री करणे आवश्यक आहे. पुढे मंडळाव्दारे होणारा पत्रव्यवहार याच पत्त्यावर केला जाईल.
4. अर्जदाराचा आधारकार्डशी सलंग्न (Linked) स्वतःचा व विवाहित असल्यास पती/पत्नीचा भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile No.) व ई-मेल आय. डी. (E-mail ID)
5. अर्जदाराचे महाराष्ट्रातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domecile Certificate) (सन-2018 नंतरचे)
6. उत्पन्नाच्या स्तोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराने दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 (Assesment Year-2024-25) मधील आयकर विवरण पत्र अथवा दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 तहसिलदाराचा उत्पत्राचा दाखला.
7. आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र ते उपलब्ध नसल्यास जातीचा दाखला.
8. इतर आरक्षित गटांसाठी निश्चित करुन देण्यात आलेले विहित नमून्यातील सक्षम प्राधिकान्याने साक्षांकित केलेले प्रमाणपत्र.
9. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशिलामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, आयएफसी कोड, एमआयसीआर क्रमांक योग्य असल्याची व सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी तसेच ही रक्कम परत करण्यासाठी याच बँक खात्याचा उपयोग केला जाईल. चुकीचे बँक तपशील दिल्यावर अनामत रक्कम परत करताना अडचणी आल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही.
अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशिल देऊन अर्ज करता येणार नाही. तसेच चालू खाते, संयूक्त खाते, एन.आर.आय. खात्याचा तपशील चालणार नाही. तसे केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
अर्जदारांच्या बँकेच्या शाखेचा MICR/IFSC क्रमांक टाईप केल्यानंतर सदर बँक व शाखेचे नाव आपोआप प्रदर्शित होत नसेल तर अर्जदाराने अन्य बँक खात्याची माहिती द्यावी. अथवा स्वतःच्या बँकेशी संपर्क साधावा.
ऑन लाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार वेगवेगळ्या संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील.
ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याची मुदत 08/08/2024 दुपारी 12.00 पासून ते 04/09/2024 रात्री 12.00 वाजेपर्यंत राहील.अर्ज करताना अर्जदार पात्र असलेल्या उत्पन्न गटाकरिता अर्ज करु शकतात.अनामत रक्कमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता (View) येऊ शकेल. अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करुन त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनामत रक्कम भरण्याआधीच सर्व माहिती योग्य पद्धतीने काळजीपूर्वक भरावी.
हेही वाचा :