एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MHADA Lottery Mumbai : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरला निकाल

MHADA Lottery: म्हाडानं जाहीर केलेल्या लॉटरीच्या अर्ज नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. तर, सोडत 13 सप्टेंबरला पार पडणार आहे.

MHADA Lottery Mumbai : मुंबई : स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत (Mumbai News) स्वतः, हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. अशातच म्हाडाच्या (MHADA) लॉटरीची आतुरतेनं वाट पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणानं (MHADA Lottery) मुंबईतील तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीच्या अर्ज नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. तर, सोडत 13 सप्टेंबरला पार पडणार आहे. या लॉटरीतंर्गत गोरेगाव, मालाड, जुहू, अॅन्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, ताडदेव अशा विविध ठिकाणी असलेल्या घरांच्या किमती 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. या घरांच्या विक्रीतून तब्बल 2100 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा होणार आहेत. जर तुम्ही या लॉटरीसाठी इच्छुक असाल, तर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकता. तसेच, घरांची संगणकीय सोडत ऐन गणेशोत्सवात म्हणजेच 13 सप्टेंबरला पार पडणार आहे.

म्हाडाने बांधलेल्या 1327 घरांसोबत कास नियंत्रण नियमावाली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डर्सकडून मिळालेली 370 घरं आणि पूर्वीच्या लॉटरीत विविध ठिकाणी  उरलेल्या 333 घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक  असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील  पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. 

कोणत्या गटासाठी किती घरं?

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत.

म्हाडाच्या अर्जाची किंमत किती?

अर्ज शुल्क 500/- रुपये + जीएसटी @ 18 टक्के, 90/- रुपये = एकूण 590/- रुपये अर्ज शुल्क विना परतावा

म्हाडा लॉटरीचं सविस्तर वेळापत्रक काय? 

  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरूवात दिनांक आणि वेळ - 9 ऑगस्त 2024 दुपारी 12 वाजल्यापासून
  • अनामत रक्कम भरण्याची दिनांक आणि वेळ - 9 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजल्यापासून
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आणि वेळ - 4 ऑगस्ट 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत
  • अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटचा दिनांक आणि वेळ - 4 ऑगस्ट 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत
  • सोडतीसाठी प्राप्त अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक आणि वेळ - 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता
  • प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे/हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक आणि वेळ - 10 सप्टेंबर 2024 दुपारी 12 वाजेपर्यंत
  • सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी प्रसिद्धी दिनांक आणि वेळ - 11 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता
  • सोडतीचा दिनांक आणि वेळ -  13 सप्टेंबर सकाळी 11 वाजता
  • सोडतीचं ठिकाण - नंतर जाहीर करण्यात येईल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP MajhaYugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Embed widget