एक्स्प्लोर

वादग्रस्त हॉकर्स झोन रद्द, राज, राणेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार नाहीत!

जुन्या फेरीवाला धोरणानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या घरासमोर हॉकर्स झोन तयार करण्यात आला होता.

मुंबई: मोठ्या वादानंतर अखेर मुंबईतल्या हॉकर्स झोनची यादी मुंबई महापालिकेला बासनात गुंडाळावी लागली आहे. हॉकर्स झोनची यादी रद्द करुन नवीन नियोजन करा आणि नवी यादी तयार करा असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. जुन्या फेरीवाला धोरणानुसार मनसे अध्यक्ष राज  ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या घरासमोर हॉकर्स झोन तयार करण्यात आला होता. मुंबई महापालिकेनं मुद्दाम राज यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोप मनसेनं केला होता. तर आमच्या घरासमोर फेरीवाले बसवून दाखवा, मग ‘मातोश्री’बाहेर कसे फेरीवाले उभे करायचे हे आम्हाला चांगलं माहित आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं. “नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या प्रभागाची माहिती असते. कोणत्या रस्त्यांना जास्त वाहतूक, ट्रॅफिक असते हे माहित आहे. पण स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता, अधिकाऱ्यांनी हॉकर्स झोन तयार केले. मात्र या मनमानी यादीविरोधात सर्वांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ही यादी रद्द केली”, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले. नेमकं प्रकरण काय? मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार केले. यामध्ये दिग्गज सेलिब्रेटींच्या घराबाहेर फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण देण्याचा प्रस्ताव होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासाप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे, अभिनेता आमीर खान आणि संजय दत्त यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना महापालिकेने जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला. पण उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली. यावरुन मनसे आणि नितेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र आता हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. कुठे कुठे फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित होत्या? मुंबई महापालिकेकडून 1366 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून प्रस्तावित 85 हजार 891 फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित फेरीवाला क्षेत्रासाठी 10 फुटांचा फूटपाथ आवश्यक शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयांपासून 100 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही अभिनेता आमीर खानचं निवासस्थान असलेल्या हिल रोड 12वा रस्ता, या ठिकाणी 10 फेरीवाल्यांसाठी जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेंच्या जुहूतील तारा रोड परिसरात घराबाहेर 36 फेरीवाले प्रस्तावित अभिनेता संजय दत्तचे निवासस्थान असलेल्या पाली हिल रस्त्यावर 10 फेरीवाल्यांसाठी जागा 'कृष्णकुंज'बाहेरील दोन रस्त्यांवर प्रत्येकी 10 असे 20 फेरीवाले प्रस्तावित 'राजगड'बाहेरील रस्त्यावर 200 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित दादरमध्ये नियमानुसार अत्यंत तुरळक फेरीवाल्यांना जागा प्रस्तावित दादर-धारावीमधील जी नॉर्थ विभागात 4 हजार 455 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये संबंधित बातम्या ...तर ‘मातोश्री’समोरही फेरीवाले उभे करु : नितेश राणे राज ठाकरे, आमीरच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी मनसेच्या ‘कृष्णकुंज’वरील बैठकीत नेमकं काय ठरलं? राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’बाहेरच फेरीवाले बसणार?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Missing Link Accident : मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघाताचा थरार; तिघांचा दुर्दैवी मृत्यू, तर चार जण गंभीर, वाहतूक विस्कळीत
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू, तर चार जण गंभीर, वाहतूक विस्कळीत
महसूल विभागातील सुनावण्यांबाबत मोठा निर्णय, वेळेत निकालासाठी नवीन कार्यपध्दती लागू, मंत्री बावनकुळेंचा पुढाकार
महसूल विभागातील सुनावण्यांबाबत मोठा निर्णय, वेळेत निकालासाठी नवीन कार्यपध्दती लागू, मंत्री बावनकुळेंचा पुढाकार
मोठी बातमी! राज्यातील पोलिस खात्यात फेरबदल, तेजस्वी सातपुतेंना मिळाली बढती, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
मोठी बातमी! राज्यातील पोलिस खात्यात फेरबदल, तेजस्वी सातपुतेंना मिळाली बढती, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य भावाचं आश्वासनही मिळालं होतं : सुनील तटकरे
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य भावाचं आश्वासनही मिळालं होतं : सुनील तटकरे

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Embed widget