एक्स्प्लोर
मराठा मोर्चा: मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यावर वसुली बंद
मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली कालपासून बंद आहे.

(File Photo)
मुंबई: मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली कालपासून बंद आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका, अशी सगळीकडे टोलवसुली बंद आहे. मराठा मोर्चा ‘एक मराठा; लाख मराठा’ अशी घोषणा देत आज मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी जशी मोर्चेकऱ्यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही केली आहे. मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येत आहे. मोर्चासाठी संघटनांचं आवाहन 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आणखी वाचा























