एक्स्प्लोर
Advertisement
शेवटच्या मराठा मोर्चाकडून छत्रपतींची एक अपेक्षा!
देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई मराठा मोर्चात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली.
मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई मराठा मोर्चात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली. संभाजी राजे हे आझाद मैदानात जाऊन सर्वसामान्य मोर्चेकऱ्यांसोबत बसले.
“मी छत्रपती म्हणून नाही, मी खासदार म्हणून नाही, मी एक सामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.
“मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं आहे. ज्याप्रमाणे राज्यभरात 57 मोर्चे झाले, त्याप्रमाणे मुंबईतील हा 58 वा मोर्चे असेल. हा मोर्चाही शांततेत काढावा, आपला मेसेज जगाला द्यावा, जगाला हेवा वाटेल असा हा शेवटचा मोर्चा काढावा, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी’, असं आवाहन संभाजीराजेंनी शेवटच्या मोर्चाच्या निमित्ताने केलं.
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, यासाठी हा समाज रस्त्यावर आला आहे. हा सकल मराठा समाज आहे. हा समाज एकजूट झालाय हा प्रस्थापितांना संदेश आहे. ज्यांनी ज्यांनी मराठ्यांचा राजकारणासाठी वापर केला त्यांना हा संदेश आहे, असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.
संबंधित बातम्या
आशिष शेलार यांना धक्काबुक्की, मात्र शेलारांचा इन्कार
रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट!
बाळासाहेबांचं पोस्टर ठेवलं, शिवसेनेचं पोस्टर फाडलं!
मराठा मोर्चा: मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यावर वसुली बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
Advertisement