एक्स्प्लोर
Mumbai Lockdown | पोर हिरमुसलं... मुंबईत लॉकडाऊनमुळे आईवडील अन् मुलाची ताटातूट
लॉकडाऊनमध्ये लेकरु आणि आई अगदी अवघ्या काही अंतरावर असूनही भेटू शकत नाहीयेत.
मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकून पडले आहेत. काळात अनेक जण आपल्या प्रियजणांपासून दूर आहेत. मुंबईत देखील एका आईवडील अन् मुलाची ताटातूट झाली आहे. अचानक लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आई-वडील मुंबईत तर मुलगा विरारला आजी आजोबांकडे अडकून पडले आहेत.
सात वर्षाचा आरिव आयरे. दुसऱ्या इयत्तेतील परीक्षा 10 मार्चला झाली. आणि त्याला आनंद झाला. आता सुट्ट्या मिळाल्या याचा आनंद त्याला झाला. आरिवची आई वैशाली आणि वडील अशोक दोघेही नोकरीला जातात. आरिवला घरी एकटं सोडणे शक्य नव्हते म्हणून थोड्या दिवसासाठी त्यांनी मुलाला आजी आजोबांकडे विरारला पाठवले. तेव्हा कुणाला वाटलंच नव्हतं की कोरोनाचे संकट इतकं मोठं होईल. लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल.कोणीच प्रवास करू शकणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि आरिव आजी आजोबांकडे आणि आई वडील पार्ल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. आरिवला आजीआजोबा, आईवडिलांनी सगळी परिस्थिती समजवून सांगितली. 14 एप्रिलपर्यंतच वेळ काढायचा आहे. मग सगळं ठीक होईल असं सांगितल्यामुळे तो चिमुरडाही तयार झाला. सुरुवातीला आरिव रमला मग नंतर कॅलेंडरवर दिवस मोजत दररोज आई वडिलांशी व्हिडीओ कॉल मधून बोलत 14 तारखेची वाट पाहत होता.
आणि लॉकडाऊन पुन्हा 3 मे पर्यंत वाढवला. हे कळल्यावर चिमुकला आरिव हिरमुसला. इतके दिवस कधीच तो आईपासून लांब राहिला नाही. आरिव आईला फोन करून सांगतो. 'मी चालत येतो आई, तू माझी काळजी नको करू'. आई वडील,आजी आजोबा सगळे त्याची समजूत दररोज काढतात पण तो पुन्हा कॅलेंडर बघून दिवस मोजत आहे.
मुंबईत नोकरीमुळे विभक्त राहणारी अनेक कुटुंब आहेत. परीक्षा झाल्यावर अनेकदा मुलांना आजी आजोबांकडे सोडलं जातं.पण कोरोनामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती आली. आई आणि मुलाची ताटातूट झाली तरी जबाबदार नागरिक म्हणून वैशाली आणि अशोक आपल्या मुलापासून दूर आहेत त्याला आजही समजवत आहेत. पण पोलिसांनी परवानगी दिली तर मुलाला घेऊन येण्याची इच्छाही आहे. लॉकडाऊनमध्ये लेकरू आणि आई अगदी अवघ्या काही अंतरावर असूनही भेटू शकत नाही हे चित्र नक्कीच हेलावून सोडणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement