एक्स्प्लोर

Mumbai Local Train live Updates : मुंबईत लोकल सेवा विस्कळीत, पहा प्रत्येक अपडेट

Mumbai Local Train News Updates : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

LIVE

Key Events
Mumbai Local Train live Updates : मुंबईत लोकल सेवा विस्कळीत, पहा प्रत्येक अपडेट

Background

Mumbai Local Train News Updates : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. काल पुद्दुचेरी एक्स्प्रेसनं गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवरही झालाय. फास्ट ट्रॅकवरील कल्याण सीएसएमटी मार्गावरील जलद लोकल सेवा सकाळी साडे आठ वाजता पूर्ववत होणार आहे तर सीएसएमटी कल्याण जलद ट्रॅकवरील सेवा पूर्ववत होण्यास दुपारचे 12 वाजणार आहे. या अपघातानंतर या मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

आज मध्य रेल्वेचा वाढदिवस आहे, मध्य रेल्वेने आज 170 व्या वर्षात पदार्पण केले आहे, आणि आजच्या दिवशी देखील प्रवाश्यांना फटका बसतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळित झालेली असताना, बेस्टने अधिकच्या बस सोडल्याचे जाहीर केलेले नाही, त्यामुळे प्रवासी स्टेशनवर खोळंबून आहेत, टीएमटीने देखील बसेस सुरू केलेय नाहीत, त्यामुळे ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी पर्याय केवळ रिक्षा टॅक्सी असाच आहे.

मुंबईतील एक्स्प्रेस अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा, या एक्सप्रेस रद्द 

एक्सप्रेस स्लो ट्रॅकवर वळवल्यानं स्लो गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. फास्ट लोकल वाहतूक धीम्या गतीनं आहे. तर सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजणार असल्याची माहिती आहे.  कल्याण ते सीएसएमटी फास्ट ट्रॅकवरील लोकल सुरु असून सरासरी दोन तास उशिराने गाड्या आहे. अनेक एक्सप्रेस देखील सरासरी दोन तासाने उशिराने धावत आहेत. 

सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या

महालक्ष्मी एक्सप्रेस दादरला सकाळी 7.15 वाजता पोहोचते मात्र ती सकाळी 8.55 वाजता पोहोचली आहे. ठाणे ते माटुंगा दरम्यान अनेक स्लो गाड्या रांगेत आहेत. सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळं मुंबईकरांची मोठी अडचण झाली आहे. अनेक जण स्टेशन टू स्टेशन पैदल वारी करत असल्याचं दिसून आलं आहे. पीक अव्हरमध्ये चाकरमान्यांना मोठ्या प्रवासा दरम्यान वेळ खर्ची घालावा लागणार असून सोबतच अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे. 

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं की, सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजण्याची शक्यता आहे.  टीएमसी आणि मुंबई महापालिकेला आवाहन केलंय की बसेसची संख्या वाढवावी.  स्लो ट्रॅकवर सकाळी 8.10 मिनिटांआधीच्या एक्सप्रेस गाड्या वळवल्या होत्या.  कल्याण ते सीएसएमटी फास्ट गाड्यांची वाहतूक सुरु करण्यात आलीय, मात्र वेळापत्रक सुरळीत होण्यास काही वेळ जाऊ शकतो.  झालेल्या दुर्घटनेची चौकशी होईल, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच काही ठोस असं सांगता येईल, असं सुतारांनी सांगितलं. 

या अपघातामुळे काल रात्रीपासून कोणत्या एक्स्प्रेस रद्द झाल्यात 

मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस Manmad-Mumbai Panchvati Express

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस Pune-Mumbai Sinhagad Express

मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस Mumbai-Pune Sinhagad Express

मनमाड-मुंबई समर स्पेशल Manmad-Mumbai Summer Special

मुंबई- मनमाड समर स्पेशल  Mumbai-Manmad Summer Special

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 12124 Pune-Mumbai Deccan Queen

18:20 PM (IST)  •  16 Apr 2022

Mumbai Local :  बिघाड दुरूस्त, परंतु, लोकलचे वेळापत्रक कोलमडले 

Mumbai Local :  काल रात्री रेल्वेचा अपघात झाल्यानंतर सर्व बिघाड दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. परंतु, अजूनही लोकलचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. लोकल अजूनही 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. 

12:22 PM (IST)  •  16 Apr 2022

काल रात्री रेल्वेचा अपघात झाल्यापासून शहरातील उपनगरी प्रवाशांचे बेसुमार हाल सुरू

काल रात्री रेल्वेचा अपघात झाल्यापासून शहरातील उपनगरी प्रवाशांचे बेसुमार हाल सुरू आहेत मात्र बेस्ट करून बारा तास उलटून गेल्यानंतरही कोणत्याही विशेष बस सेवा चालवण्यात आलेल्या नाही किंवा याबाबतची माहिती सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात आलेली नाही.

12:20 PM (IST)  •  16 Apr 2022

Mumbai Local : मध्य रेल्वेच्या वाढदिवशीच मुंबईकरांना फटका! वाहतूक विस्कळीत, प्रवाशी स्टेशनवर अडकले; कधीपर्यंत सुरुळीत होणार?

Mumbai Local : मध्य रेल्वेच्या वाढदिवशीच मुंबईकरांना फटका! वाहतूक विस्कळीत, प्रवाशी स्टेशनवर अडकले; कधीपर्यंत सुरुळीत होणार?

 https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-local-train-news-updates-mumbai-train-derailment-rail-way-accident-at-matunga-mumbai-1050869 

12:17 PM (IST)  •  16 Apr 2022

फक्त दहा ते पंधरा मिनिटे उशिरा आल्यामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही

तब्बल चार वर्षानंतर ही परीक्षा झाल्याची माहिती आहे आणि चार वर्षानंतर परीक्षा होऊन फक्त दहा ते पंधरा मिनिटे उशिरा आल्यामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.अकरा ते बारा असा एक तास पेपर होता परीक्षा संपली आहे विद्यार्थी निघून जात आहे.

12:16 PM (IST)  •  16 Apr 2022

या अपघातामुळे काल रात्रीपासून कोणत्या एक्स्प्रेस रद्द झाल्यात 

मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस Manmad-Mumbai Panchvati Express

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस Pune-Mumbai Sinhagad Express

मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस Mumbai-Pune Sinhagad Express

मनमाड-मुंबई समर स्पेशल Manmad-Mumbai Summer Special

मुंबई- मनमाड समर स्पेशल  Mumbai-Manmad Summer Special

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 12124 Pune-Mumbai Deccan Queen

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्तPune Vidhansabha Election :  पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
Embed widget