एक्स्प्लोर

Mumbai Local : मध्य रेल्वेच्या वाढदिवशीच मुंबईकरांना फटका! वाहतूक विस्कळीत, प्रवाशी स्टेशनवर अडकले; कधीपर्यंत सुरुळीत होणार?

Mumbai Local Train News Updates : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local Train News Updates : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. काल पुद्दुचेरी एक्स्प्रेसनं गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवरही झालाय. फास्ट ट्रॅकवरील कल्याण सीएसएमटी मार्गावरील जलद लोकल सेवा सकाळी साडे आठ वाजता पूर्ववत होणार आहे तर सीएसएमटी कल्याण जलद ट्रॅकवरील सेवा पूर्ववत होण्यास दुपारचे 12 वाजणार आहे. या अपघातानंतर या मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

आज मध्य रेल्वेचा वाढदिवस आहे, मध्य रेल्वेने आज 170 व्या वर्षात पदार्पण केले आहे, आणि आजच्या दिवशी देखील प्रवाश्यांना फटका बसतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळित झालेली असताना, बेस्टने अधिकच्या बस सोडल्याचे जाहीर केलेले नाही, त्यामुळे प्रवासी स्टेशनवर खोळंबून आहेत, टीएमटीने देखील बसेस सुरू केलेय नाहीत, त्यामुळे ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी पर्याय केवळ रिक्षा टॅक्सी असाच आहे.

मुंबईतील एक्स्प्रेस अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा, या एक्सप्रेस रद्द 

एक्सप्रेस स्लो ट्रॅकवर वळवल्यानं स्लो गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. फास्ट लोकल वाहतूक धीम्या गतीनं आहे. तर सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजणार असल्याची माहिती आहे.  कल्याण ते सीएसएमटी फास्ट ट्रॅकवरील लोकल सुरु असून सरासरी दोन तास उशिराने गाड्या आहे. अनेक एक्सप्रेस देखील सरासरी दोन तासाने उशिराने धावत आहेत. 

सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या

महालक्ष्मी एक्सप्रेस दादरला सकाळी 7.15 वाजता पोहोचते मात्र ती सकाळी 8.55 वाजता पोहोचली आहे. ठाणे ते माटुंगा दरम्यान अनेक स्लो गाड्या रांगेत आहेत. सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळं मुंबईकरांची मोठी अडचण झाली आहे. अनेक जण स्टेशन टू स्टेशन पैदल वारी करत असल्याचं दिसून आलं आहे. पीक अव्हरमध्ये चाकरमान्यांना मोठ्या प्रवासा दरम्यान वेळ खर्ची घालावा लागणार असून सोबतच अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे. 

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं की, सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजण्याची शक्यता आहे.  टीएमसी आणि मुंबई महापालिकेला आवाहन केलंय की बसेसची संख्या वाढवावी.  स्लो ट्रॅकवर सकाळी 8.10 मिनिटांआधीच्या एक्सप्रेस गाड्या वळवल्या होत्या.  कल्याण ते सीएसएमटी फास्ट गाड्यांची वाहतूक सुरु करण्यात आलीय, मात्र वेळापत्रक सुरळीत होण्यास काही वेळ जाऊ शकतो.  झालेल्या दुर्घटनेची चौकशी होईल, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच काही ठोस असं सांगता येईल, असं सुतारांनी सांगितलं. 

या अपघातामुळे काल रात्रीपासून कोणत्या एक्स्प्रेस रद्द झाल्यात 

मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस Manmad-Mumbai Panchvati Express

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस Pune-Mumbai Sinhagad Express

मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस Mumbai-Pune Sinhagad Express

मनमाड-मुंबई समर स्पेशल Manmad-Mumbai Summer Special

मुंबई- मनमाड समर स्पेशल  Mumbai-Manmad Summer Special

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 12124 Pune-Mumbai Deccan Queen

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Embed widget