एक्स्प्लोर

मुंबईत लोकलसमोर लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा प्रयत्न, मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, पोलिसांत गुन्हा दाखल

Mumbai Local News : मुंबईत लोकलसमोर लोखंडी ड्रम ठेवून अज्ञात इसमाचा घातपाताचा प्रयत्न उधळून लावला आहे. मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Local News : मुंबईत लोकलसमोर (Mumbai Local) रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा डाव मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. सँडहर्स्ट रोड (Sandhurst Road) -भायखळा (Byculla) स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं रुळावर 15 ते 20 किलो दगडानं भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता. मात्र प्रसंगावधान दाखवत मोटरमन अशोक शर्मा यांनी अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. अशोक शर्मा यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. अशोक शर्मा यांच्या कृत्याचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जात आहे.  

दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटीवरुन खोपोलीकडे जलद मार्गावरुन जाणारी लोकल रवाना झाली. ती पुढे जाऊन सँडहर्स्ट रोड स्थानकात थांबली. सँडहर्स्ट रोड स्थानकातून लोकल पुढे निघाल्यावर मोटरमनला रुळांवर काहीतरी दिसलं. संशयास्पद वाटल्यानं मोटरमननं अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. मोटरमन स्वतः लोकलमधून उतरुन त्या वस्तूजवळ गेले. तर तो मोठा ड्रम होता. आणि त्या ड्रममध्ये तब्बल 15 ते 20 किलोंचे दगड भरुन ठेवलेले होते. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. 

मुंबईत लोकलसमोर लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा प्रयत्न, मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, पोलिसांत गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत लोकलसमोर रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा डाव होता. मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. सँडहर्स्ट रोड-भायखळा स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं रुळांवर 15 ते 20 किलो दगडानं भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता. त्याचवेळी या मार्गावरुन दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटीवरुन खोपोलीकडे जलद लोकल रवाना झाली. त्यावेळी सँडहर्स्ट रोड स्टेशन सोडताच मोटरमन अशोक शर्मा यांना रुळावर लोखंडी ड्रम दिसला. प्रसंगावधान दाखवत अशोक शर्मा यांनी अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. मोटरमन अशोक शर्मा स्वत: त्यानंतर रुळावर उतरले. त्यांना रुळावर लोखंडी ट्रम दिसला. ते त्या ड्रमजवळ पोहोचले तर त्या ड्रममध्ये 15 ते 20 किलो दगड भरल्याचं आढळून आलं. प्रवाशांच्या मदतीनं शर्मा यांनी तो ड्रम हटवला. शर्मा यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

No Mega block on Sunday : मुंबईकरांसाठी खुशखबर! रविवारी कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget