एक्स्प्लोर
मुंबई लोकल : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मेगाब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.
![मुंबई लोकल : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक Mumbai Local : Megablock on central, harbour and western lines मुंबई लोकल : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/02075156/block.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईत रेल्वेचा मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गावर आज (रविवारी) मेगाब्लॉक असणार आहे. ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक बाबींची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जात आहे.
मेगाब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.
मध्य रेल्वे
रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घेण्यात येणार आहे.
दरम्यान मुलुंडहून सुटणाऱ्या सर्व धीम्या आणि अर्ध जलद लोकल सकाळी 10.47 ते दुपारी 3.50 पर्यंत मुलुंड ते कल्याणपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील.
हार्बर रेल्वे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
या काळात सीएसएमटी ते वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, अंधेरी, गोरेगाव या सेवाही बंद असतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल उशिराने धावतील. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत हा ब्लॉक असेल.
ब्लॉकदरम्यान सांताक्रुझ ते गोरेगाव जलद मार्गावरील लोकल गाड्या धम्या मार्गावरुन चालवण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)