एक्स्प्लोर
Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Megablock News : रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Local Train Mega Block Sunday
Source : CMS Image Bank
Mega Block Sunday, 24 March : मुंबईकरांच्या कामाची बातमी आहे. रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि लोकल ट्रेनने (Local Train) प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकल प्रवासाचं नियोजन करा आणि त्यानंतरचं घराबाहेर पडा.
मेगाब्लॉकचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या.
- माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपासून 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
- ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपासून 15 मिनिटे उशिरा पोहोचेल.
- डाऊन धीम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09.53 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.32 वाजता सुटेल.
- अप धीम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल असेल जी, ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल असेल जी ठाणे येथून दुपारी 04.03 वाजता सुटेल.
- अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत
- सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- डाउन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल लोकल असेल जी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.44 वाजता सुटेल.
- अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.05 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.45 वाजता सुटेल.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
आणखी वाचा






















