एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EXCLUSIVE VIDEO : जितेंद्र आव्हाडांनी मुंबई विद्यापीठाला टाळं ठोकलं
अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी निकाल आणि गुणपत्रिकेची आवश्यकता असते. मात्र ऑगस्टचा पहिला आठवडा आला, तरी सर्व परीक्षांचे निकाल न लागल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या वतीने आव्हाडांनी संताप व्यक्त केला.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विद्यापीठाच्या गेटला कुलूप ठोकलं आहे. निकालांची दुसरी डेडलाईनही उलटून गेल्यामुळे आव्हाडांनी हे प्रतिकात्मक पाऊल उचललं आहे.
ठरलेल्या वेळेत निकाल न लागल्यास टाळं ठोकू, अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी आधीच मांडली होती. त्याप्रमाणे सोमवारी रात्री आव्हाडांनी टाळं ठोकलं. युनिव्हर्सिटीच्या कलिना गेटला आव्हाडांनी कुलूप ठोकून प्रतिकात्मक आंदोलन केलं. त्याचप्रमाणे उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.
अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी निकाल आणि गुणपत्रिकेची
आवश्यकता असते. मात्र ऑगस्टचा पहिला आठवडा आला, तरी सर्व परीक्षांचे निकाल न लागल्याचं सांगत
विद्यार्थ्यांच्या वतीने आव्हाडांनी संताप व्यक्त केला.
पाहा व्हिडिओ :
मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला
राज्यपाल आणि शिक्षणमंत्र्यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी 5 ऑगस्टची डेडलाईन दिली होती. मात्र ती डेडलाईनही विद्यापीठाला पाळता आलेली नाही. कुलगुरु संजय देशमुखांनी उर्वरित सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत लागतील, असं सांगून टाकलं आहे.संबंधित बातम्या :
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं 'फोन लगाव, घंटी बजाव आंदोलन
मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे आणखी 39 निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या डेडलाईनलाही निकाल नाही
असा भोंगळ कारभार कधीही पाहिला नव्हता: आदित्य ठाकरे
रखडलेले निकाल 5 ऑगस्टला, मुंबई विद्यापीठाची डेडलाईन
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द
मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द
मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता
मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement