(Source: Poll of Polls)
Mumbai IIT : स्टुडंट वेल्फेअर सेंटरच्या प्रमुखांना बडतर्फ करत गुन्हा दाखल करा, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे निर्देश
Mumbai IIT : मुंबई आयआयटीमध्ये काम करणाऱ्या स्टुडंट वेल्फेअर सेंटरच्या प्रमुख कौन्सिलरवर गुन्हा दाखल करण्याचा आणि त्यांना पदावून बडतर्फ करण्याच्या आयोगाच्या सूचना.
Mumbai IIT : मुंबई आयआयटीत जातीय भेदभाव होत असल्याचा आरोप झाल्यानंतर आता राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने त्याची दखल घेतली आहे. मुंबई आयआयटीमध्ये काम करणाऱ्या स्टुडंट वेल्फेअर सेंटरच्या प्रमुख कौन्सिलर असलेल्या हिमा अनारेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आणि त्यांना पदावून बडतर्फ करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
मुंबई आयआयटीतील आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी मुंबई आयआयटीमध्ये जातीभेद होत असल्याचा आरोप केला होता. तसेच एससी एसटी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे मानसिक आधार मिळत नसल्याचा आरोप करत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे याचिका दाखल केली होती.
दाखल केली होती याचिका
मुंबई आयआयटीमध्ये आंबेडकर पेरियार-फुले स्टडी सर्कल या विद्यार्थी संघटनेने मागील जून 2022 मध्ये मुंबई आयआयटीमध्ये जातीभेद होत असल्याचा त्यासोबतच एससी आणि एसटी वर्गातील विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे मानसिक आधार दिला जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे याचिका दाखल केली होती.
या याचिकेची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने मुंबई आयआयटीमध्ये 22 मार्च रोजी बैठक घेऊन मुंबई आयआयटीला या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय पुढील पंधरा दिवसांमध्ये ॲक्शन टेकन रिपोर्ट मुंबई आयआयटीला राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाला सादर करायचा आहे.
विद्यार्थी संघटने केलेल्या आरोपानुसार मुंबई आयआयटीमध्ये असलेल्या स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनमध्ये एससी एसटी कौन्सिलर नसल्याचं सांगितलं. शिवाय या वेल्फेअर असोसिएशनच्या प्रमुख असलेल्या हिमा अनारेड्डी यांच्या विरोधातसुद्धा विद्यार्थ्यांनी आरोप केला. अनारेड्डी यांनी विद्यार्थ्यांना जातीवाचक वक्तव्य करत जातीभेद केल्याचा आरोप केला गेला आहे. सोबतच हिमा अनारेड्डी यांना या प्रमुख पदावरून बाजूला करण्याचं आणि एससी एसटी विद्यार्थ्यांसाठी कौन्सिलर नेमण्याची विनंती केली होती.
बैठकीनंतर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने मुंबई आयआयटीला विशेष सूचना करत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. मुंबई आयटीच्या काऊन्सिलर प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या हिमा अनारेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा त्यासोबतच त्यांना पदावरून बडतर्फ करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
मुंबई आयआयटीच्या स्टुडंट वेल्फेअर सेंटरमध्ये एसटी बॅकग्राऊंड असलेल्या कौन्सिलरची नियुक्ती करण्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासोबत दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणातील डिटेल तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना मुंबई आयआयटी ला आयोगाने दिले आहेत.
ही बातमी वाचा: