Darshan Solanki Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण, मुंबई IIT ने दिलेला अहवाल आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने नाकारला
Darshan Solanki Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात (Darshan Solanki suicide case) मुंबई आयआयटीने (Mumbai IIT) सादर केलेला अहवाल आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने नाकारला आहे.
Mumbai IIT Darshan Solanki Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात (Darshan Solanki suicide case) मुंबई आयआयटीने (Mumbai IIT) सादर केलेला अहवाल आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने नाकारला आहे. आयआयटीचा अहवाल म्हणजे बोगस डॉक्युमेंट असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. एसआयटी (SIT) चौकशीतूनच या प्रकरणात योग्य तो न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचं मत विद्यार्थी संघटनांनी (Student Union) व्यक्त केलं आहे.
आयआयटी मुंबईच्या अंतर्गत चौकशी समितीचा अहवाल म्हणजे दर्शनचा मृत्यू आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या असल्याचा कबुलीजबाब असल्याची टीका आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (एपीपीएससी ) या आयआयटीच्या विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान चौकशी समितीमध्ये संस्थेबाहेरील कुणीही सदस्य नसेल, चौकशी करण्यासाठी कोणीही सक्षम अधिकारी / तज्ज्ञ नसेल तर ही समिती निष्पक्षपणे चौकशी कशी करणार? असा प्रश्नही विद्यार्थी संघटनांनी उपस्थित करत त्यांनी हा अहवाल नाकारला आहे.
Mumbai IIT Report : आयआयटीच्या अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित
आयआयटीकडून दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत चौकशी समितीचा अहवाल आला आहे. त्यामध्ये त्याची विविध अभ्यासक्रमातील शैक्षणिक कामगिरी खालावल्याचे म्हटले आहे. त्यामुळं शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर गंभीररित्या परिणाम झाला असण्याची शक्यता आयआयटीच्या अतंर्गत चौकशी समिती अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान एपीपीएससी विद्यार्थी संघटनेकडून आयआयटीच्या अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चौकशी समितीकडून चौकशीसाठी निष्कर्ष काढण्यासाठी कोणती पद्धती वापरली गेली? कुठले प्रश्न विचारण्यात आले? विविध लोकांनी केलेल्या वक्तव्यांची विश्वासहर्ता कशी तपासली? याची कोणतीही माहिती पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळं या चौकशीच्या कार्यवाहीवरच विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली आहे.
Darshan Solanki Case : 12 जानेवारीला केली होती आत्महत्या
एसआयटीच्या अहवालाकडूनच काय तो न्याय मिळण्याची अपेक्षा असून, पुढे अशा घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली. दर्शन सोळंकी हा केमिकल इंजिनियरिंग प्रथम वर्षाला शिकत होता. 12 जानेवारीला त्याने हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आयआयटी मुंबईने या सगळ्या प्रकणारात जातीभेदाच्या आरोपांनंतर 12 सदस्यांची समिती स्थापन केली होती.
महत्त्वाच्या बातम्या: