एक्स्प्लोर
बेकायदेशीर दुकाने थाटून फटाके विकणाऱ्यांवर कारवाई करा: हायकोर्ट

मुंबई: फटाक्यांमुळे होणारी जीवितहानी ही गंभीर बाब आहे.निवासी वसाहतीत बेकायदा दुकाने थाटून फटाक्यांचा साठा करणाऱ्याचे लायसन्स रद्द करून भागणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. फटाक्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी निवासी वसाहतीमधील बेकायदा फटाक्याच्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका नाशिकचे रहिवासी चंद्रकांत लासुरे यांनी हायकोर्टाने दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना हायकोर्टाने कारवाईचे आदेश दिले. तसेच यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत असे हायकोर्टाने सांगितले आहे.
आणखी वाचा























