एक्स्प्लोर

Mumbai Rains: मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी BMCचा कर्मचारी मॅनहोलच्या तोंडावर बसला, जीव धोक्यात घालून ड्युटी बजावली

Mumbai Heavy Rain: मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला आहे. सोमवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसाने आता विश्रांती घेतली आहे.

Mumbai Rains: मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईतील पाणी तुंबण्याचे हॉटस्पॉट असलेल्या हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदू कॉलनी परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने (Water Logging) मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) या पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला असला तरी पाण्याचा निचरा वेगाने होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावरील मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे काम करताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. (Mumbai Rain news)

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जीव धोक्यात घालून पाण्याला वाट करून दिली जात आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागातील रस्त्यावर पाणी भरले. दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी (Hindu Colony) परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेल्याचे पाह्यला मिळाले. अशातच पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची झाकण उघडण्यात आली आहेत. या मॅनहोलमध्ये कोणाचा अपघात होऊ नये, म्हणून पालिकेचे कर्मचारी झाकणाभोवती बसून राहिले आहेत.

मुसळधार पावसात स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुंबईकरांच्या सुरक्षेकरता मॅनहोलभोवती पहारा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये अनवधानाने पडून अनेक जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे उघड्या मॅनहोलच्या आजुबाजूनं जाणाऱ्या मुंबईकरांना सावध करण्यासाठी बीएमसी कर्मचाऱ्याने मॅनहोलच्या झाकणावरच बसून पहारा दिला. मात्र,  यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक मिरवणाऱ्या मुंबईच्या नावाला बट्टा लागला आहे. महानगरपालिकेकडे पाण्याचा उपसा करणारे मोठ्या क्षमतेचे पंप आणि आधुनिक यंत्रसामुग्री असूनही कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. 

Heavy Rain in Mumbai: मुंबईत तुफान पाऊस

मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईतील पावसाचा जोर आणखी वाढला होता. त्यामुळे सकाळपासूनच रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली होती. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

आणखी वाचा

Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Embed widget