एक्स्प्लोर
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
Mumbai Heavy Rain: मुंबई काल रात्री मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पुढील तीन तासांमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
Mumbai Heavy rain news
1/17

मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुुरु आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने अंधार पसरला आहे.
2/17

मुंबईत जोरदार पाऊस असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. पुढील काही तास पाऊस सुरु राहिल्यास रस्त्यांवर पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प होऊ शकते.
3/17

हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. पुढील तीन तास मुंबईसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.
4/17

मुंबईत पुढील तीन तास जोरदार वारे वाहू शकतात. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
5/17

मुंबईतील चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
6/17

दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, दादर, फाईव्ह गार्डन, स्वामीनारायण मंदिर, जे.जे. फ्लायओव्हर आणि माटुंगा येथील सखल भागांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचले आहे.
7/17

अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झालेले आहे. तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
8/17

मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची (Mumbai Local Train) वाहतूक विस्कळीत झाली आहे.
9/17

सध्या मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पाच ते दहा मिनिटांच्या विलंबाने सुरु आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत आहे.
10/17

मुंबईतील जे.जे. फ्लायओव्हरवर पाणी साचले आहे.
11/17

मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. महानगरपालिकेने पंपाने पाण्याचा उपसा सुरु केला आहे.
12/17

मुसळधार पावसामुळे मुंबईतील मोनोरेल वडाळा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती.
13/17

माटुंगा रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे.
14/17

माटुंगा रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
15/17

पुढील काही तास पाऊस सुरु राहिल्यास लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प होऊ शकते.
16/17

पूनम चेंबर वरळी उत्तर वाहिनी याठिकाणी एक ते दीड फूट पाणी साचल्याने उत्तर वाहिनीकडील वाहतूक बंद केलेली असून वाहतूक कोस्टल रोड सी फेस मार्गे वळविण्यात अली आहे
17/17

मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. अशात मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुक पसरले आहे. यामुळे यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली आहे. याचा फटका रस्ते वाहतुकीला बसताना दिसत आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील आढळून येत आहे.
Published at : 15 Sep 2025 10:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
अकोला
मुंबई
महाराष्ट्र
























