एक्स्प्लोर
मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक दीड तास उशिरा
मुंबईहून गुजरातला जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल दीड तास उशिरानं सुरू आहे. सफाळे रेल्वेस्थानकालगत सिमेंट स्लीपर्स बदलण्याच्या कामात विलंब झाल्यानं, रेल्वे वाहतूक तब्बल दीड ते 2 तास उशिरानं सुरू आहे.

पालघर: मुंबईहून गुजरातला जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल दीड तास उशिरानं सुरू आहे. सफाळे रेल्वेस्थानकालगत सिमेंट स्लीपर्स बदलण्याच्या कामात विलंब झाल्यानं, रेल्वे वाहतूक तब्बल दीड ते 2 तास उशिरानं सुरू आहे.
त्यामुळे बोईसर, डहाणू, वापी, उंबरगाव भागात जाणाऱ्या कामगार वर्गाची गैरसोय झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व एक्स्प्रेसना डहाणू ते विरारपर्यंतच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
दरम्यान मुंबईकडे येणारी ट्रेन तासभर उशिरानं सुरू आहे. तर मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या गाड्या दीड ते दोन तास उशिरानं धावत आहेत.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement

















