एक्स्प्लोर

मुंबईत 500 ठिकाणी मोफत वायफाय सुविधा सुरु

मुंबई : संपूर्ण मुंबई ऑनलाईन करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत. याचाच भाग म्हणून आज 500 ठिकाणी हॉटस्पॉटच्या माध्यमातून वायफाय सेवा सुरु करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन यासंबंधी अधिकृत घोषणाही केली आहे. मुंबईला वायफायमय करण्याच्या मोहिमेची सुरुवात झाली आहे. या मोहिमेच्या पहिल्या फेजमध्ये 500 हून अधिक ठिकाणी वायफाय सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याची सविस्तर यादी सरकारनं जारी केली आहे. हॉटस्पॉटच्या माध्यमातून देण्यात येणारी वायफाय सेवा संपूर्णपणे नि:शुल्क असेल. सध्या जवळपास 500 ठिकाणी सुरु करण्यात आलेली वायफाय सेवा 1 मे 2017 पर्यंत 1200 हून अधिक ठिकाणी वायफायचे हॉटस्पॉट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/818373255165865984 https://twitter.com/Dev_Fadnavis/status/818373821875056640 राज्य सरकारनं ही सेवा सुरु केली असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मुंबईत सगळ्यात आधी शिवाजी पार्क परिसरात शिवसेना आणि मनसेनं पहिलं वायफाय सुरु केलं होतं. तुमच्या जवळचं वायफाय कसं शोधाल? तुमच्या जवळचं वाय़फाय शोधण्यासाठी सरकारच्या वेबसाईटवर यादीही देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमधूून याची माहिती दिली आहे. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/818373673098874880 आपले सरकार या संकेतस्थळाच्या माध्यमातून मुंबईकर त्यांच्या आसपास उपलब्ध असलेल्या वाय-फाय हॉटस्पॉटचा शोध घेऊ शकतात. या संकेतस्थळावर अशा सुमारे पाचशे हॉटस्पॉटची यादी उपलब्ध आहे.  सद्यस्थितीत 31 जानेवारी 2017 पर्यंत वापरकर्त्यांना या सुविधेचा मुक्त लाभ घेण्यासाठी कोणत्याही वेळेची अथवा डेटा क्षमतेची मर्यादा नाही. आपले सरकार मुंबई वाय-फाय सुविधेमुळे डिजिटल पेमेंट या शासनाच्या महत्वाकांक्षी धोरणाला बळकटी मिळणार असून जनतेला शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून सरकारशी संवाद साधणे सोपे होणार आहे. या वाय-फाय सुविधेला चाचणीच्या पहिल्या आठवड्यातच उदंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे 23 हजारपेक्षा जास्त नागरिकांनी त्याचा उपयोग केला असून त्यांच्याकडून 2 टेराबाईट इतका डाटा वापरण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पाचे शासनाच्या वतीने बारकाईने निरीक्षण करण्यात येणार आहे.  वापरकर्त्यांना या सुविधेचा उत्तम अनुभव मिळण्याच्या दृष्टीने प्रणाली राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रणालीसंदर्भातील प्रतिसाद कळविण्यासाठी ट्विटरवर@AS_Mum_WiFi हे हॅन्डल उपलब्ध आहे.  या हॅन्डलवर येणारे प्रतिसाद आणि तक्रारी यांची प्राधान्‍याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget