एक्स्प्लोर
मुंबईत हरीश चेंबर इमारतीला भीषण आग, ट्रॅफिक जाम

मुंबई : दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरातील हरिश चेंबर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 5 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, आगीमुळे लायन गेटच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र मुख्य परिसरात ही इमारत असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
दरम्यान, आगीमुळे लायन गेटच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र मुख्य परिसरात ही इमारत असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















